सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर; उपराजधानी नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
  • मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सर्वपक्षीय आमदारांची अजित पवारांकडे मागणी, कॅबिनेट बैठकीत निर्णयाची शक्यता
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
 शहर

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची लोणावळा बसस्थानकाला भेट;बसस्थानक परिसराची केली पाहणी; प्रवाशांशी साधला संवाद

डिजिटल पुणे    15-09-2025 16:38:25

पुणे : राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची आज लोणावळा बसस्थानकाला भेट देवून परिसराची पाहणी केली.यावेळी महामंडळाचे नियोजन व पणन महाव्यवस्थापक जयेश बामणे, प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अरुण सिया आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बसस्थानक येथील प्रसाधनगृहाची पाहणी उपहारगृहालाही भेट दिल्यानंतर श्री. सरनाईक म्हणाले,  मंत्री महोदय भेट देणार आहेत म्हणून केवळ एका दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका, प्रवाशांना दररोज स्वच्छ टापटीप बसस्थानक, निर्जंतूक प्रसाधनगृहे आणि वाजवी दरामध्ये खाद्यपदार्थ मिळतील असे उपहारगृह असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने स्थानिक एसटी प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी दिले.

यावेळी श्री. सरनाईक यांनी बसस्थानकावर प्रतिक्षालयात असलेल्या प्रवाशांशी संवाद साधला असता काही प्रवाशांनी लोणावळा बसस्थानकावर वेळापत्रकानुसार नियोजित बसेस येत नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ बसची वाट बघावी लागते, अशी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत, पुणे प्रादेशिक व्यवस्थापकांनी सर्व बसेस वेळापत्रकानुसार लोणावळा बसस्थानकावर आल्या पाहिजेत,  अशी सूचना संबंधित आगार व्यवस्थापक यांना देण्याच्या सूचना श्री. सरनाईक यांनी केली.


 Give Feedback



 जाहिराती