सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर; उपराजधानी नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
  • मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सर्वपक्षीय आमदारांची अजित पवारांकडे मागणी, कॅबिनेट बैठकीत निर्णयाची शक्यता
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
 जिल्हा

आष्टी (जि.बीड) तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदत बचाव कार्याला गती; एअरलिफ्ट करण्यासाठी नाशिकहून हॅलिकॉप्टर

डिजिटल पुणे    16-09-2025 10:46:07

मुंबई :- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून लष्कराच्या तुकडीची मदत आणि एअरलिफ्ट करण्यासाठी नाशिकहून हॅलिकॉप्टर मागवण्यात आले आहे. तसेच पुणे येथून एनडीआरएफचे पथक बीड येथे पाठविण्यात येत असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील, कडा गावामध्ये ११ नागरिक, सोभा निमगाव मध्ये १४ नागरिक, घाटा पिंपरी सात नागरिक, पिंपरखेड सहा नागरिक, धानोरा मध्ये तीन आणि डोंगरगण मध्ये तीन असे नागरिक अडकलेले आहेत. या सहा गावातील अडकलेल्या ४४ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी, बीड यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार आवश्यक मदत उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती