सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर; उपराजधानी नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
  • मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सर्वपक्षीय आमदारांची अजित पवारांकडे मागणी, कॅबिनेट बैठकीत निर्णयाची शक्यता
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
 जिल्हा

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

डिजिटल पुणे    16-09-2025 10:50:39

पुणे : सणसर गावात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली; पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. प्रशासनाने तालुक्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन बाधितांना तातडीची मदत करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती मंत्री श्री. भरणे यांनी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडून घेऊन ते म्हणाले, सणसर येथील ओढ्याला पूर येऊन लोकवस्तीत पाणी शिरल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावी.

पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे. नागरिकांची ओढा खोलीकरणाची मागणी विचारात घेता, त्यांना होणारा त्रास कमी करण्याकरिता प्रशासनाने लवकरात लवकरात ओढ्याचे खोलीकरण काम करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री भरणे यांनी दिले.यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

 


 Give Feedback



 जाहिराती