सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर; उपराजधानी नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
  • मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सर्वपक्षीय आमदारांची अजित पवारांकडे मागणी, कॅबिनेट बैठकीत निर्णयाची शक्यता
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
 जिल्हा

कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    16-09-2025 12:07:48

मुंबई : राज्यातील जनतेसाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विनायक निपुण, सचिव वीरेंद्र सिंग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, आरोग्य सेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे तसेच कॅन्सर केअर प्रकल्पाचे मानद सल्लागार डॉ.कैलास शर्मा, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ.सी.एस. प्रमेश, संचालक डॉ.श्रीपाद बनावली, संचालक डॉ.पंकज चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

कर्करोगावर प्रभावी उपचार होण्यासाठी विविध पातळ्यांवर कर्करोग उपचार केंद्रांची उभारणी आवश्यक असल्याचे असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर येथील संत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयाच्या इमारतीचे अपूर्ण बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यात यावे. यासाठी आवश्यक निधी पुरवणी मागण्यात देण्यात येईल. श्री साई संस्थान यांच्या वतीनेही साईनगर, शिर्डी येथे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत साई संस्थानाला आवाहन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील गरजू व्यक्तीला तत्काळ सेवा मिळाल्या पाहिजे, यासाठी तीन प्रकारच्या उपचार केंद्रांपैकी एल ३ करिता सिंगल क्लाउड कमांड केंद्र स्थापन करावे. त्याचबरोबर कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांना शीघ्र निदान व प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग उपचार सेवा, निदान, डे केअर रेडिओथेरेपी आणि केमोथेरपी युनिटची उभारणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.


 Give Feedback



 जाहिराती