सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
  • विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर; उपराजधानी नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
  • मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सर्वपक्षीय आमदारांची अजित पवारांकडे मागणी, कॅबिनेट बैठकीत निर्णयाची शक्यता
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
 जिल्हा

परिवहन प्राधिकरणाने निश्चित केल्यानुसार इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची भाडे आकारणी बंधनकारक

डिजिटल पुणे    16-09-2025 14:31:25

मुंबई : परवाना प्राप्त दुचाकी ॲग्रीगेटर धारकांना आता यापुढे राज्य परिवहन प्राधिकरणाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत निश्चित केलेल्या भाड्याप्रमाणे भाडे आकारणी करणे बंधनकारक असणार आहे.“महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५” अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर राज्यात प्रथमतः करण्यात येत आहेत. राज्यात सदर भाडेदरामध्ये एकसूत्रता, समानता असावी यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने बैठकीत “महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५” अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर प्रति कि.मी. १०.२७ रुपयेप्रमाणे आकारणी करण्यास मान्यता दिली. ॲग्रीगेटर बाईक टॅक्सीचा पहिला टप्पा १.५ कि.मी. असल्यामुळे पहिल्या टप्याचे भाडे १५ रुपये असेल व त्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटर दराप्रमाणे आकारणी करण्यात येईल.

राज्य शासनाने ०४ जुलै २०२५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५ लागू केले आहे. मोटार वाहन अधिनियम, राज्य परिवहन प्राधिकरण यांची २७७ वी बैठक अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन) तथा अध्यक्ष, राज्य परिवहन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली १८ ऑगस्ट २०२५ रोजी झाली होती.

राज्य परिवहन प्राधिकरणाने या बैठकीत मे. उबेर इंडिया सिस्टीम प्रा.लि, मे. रोपेन ट्रान्सपोर्टशन सव्हिसेस प्रा.लि, मे. ॲनी टेक्नोलॉजीसेस प्रा.लि यांना ३० दिवसाकरीता “मुंबई महानगर क्षेत्राकरीता” Provisional Licence जारी करण्यास मान्यता दिली. त्याचप्रमाणे अर्जदाराकडून ३० दिवसाच्या आत सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर पक्का परवाना प्रदान करण्याच्या अंतिम मान्यतेसाठी राज्य परिवहन प्राधिकरणासमोर सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले, असे अपर परिवहन आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


 Give Feedback



 जाहिराती