पुणे : विद्यार्थ्यांच्या चिकित्सक व चौकस बुद्धीला चालना मिळत त्यांच्यामध्ये संशोधकता वाढीस लागावी, या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील संशोधन समितीच्या वतीने आयोजित अविष्कार संशोधन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. मानसी कुर्तकोटी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील डॉ. दीप्ती सिद्धये तसेच महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंदा हासे, स्पर्धा समन्वयक डॉ. राणी भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्पाबद्दल त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या ज्ञान व कौशल्याची चाचणी घेतली.सदर स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र व व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातील सुमारे 44 विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत अभ्यासपूर्ण संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. या स्पर्धेसाठी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. मानसी कुर्तकोटी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील डॉ. दीप्ती सिद्धये यांनी बाह्य परीक्षक तर महाविद्यालयातील डॉ. प्रवीण चोळके, डॉ.अमृता इनामदार, डॉ. विशाल पावसे, डॉ मेधा मिसार यांनी अंतर्गत परीक्षक म्हणून काम पाहत विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांचे निष्पक्ष परीक्षण करत त्यांचे कौतुक केले.
सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. सीमा चौहान, डॉ. क्रांती बोरावके, डॉ. योगेश खोल्लम, डॉ. मनीषा शिंदे, प्रा. चेतना पाटील, प्रा. शितल शेकडे, प्रा. वीणा कारंडे, प्रा. वनिता शिंदे, प्रा. तनुजा तारू, प्रा. अरबाज सय्यद, स्मिता गायकवाड, प्रणित पावले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.