सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी साहेब, दादा, ताई पुन्हा एक व्हा, नागपुरातील फ्लेक्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष
  • अतिवृष्टीचा दणका, बळीराजाला फटका! पिकात छातीएवढं पाणी, सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टक शेती पाण्याखाली
  • बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा
  • मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली
  • पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; मध्यरात्री घायवळ टोळीकडून भररस्त्यात फायरींग, एक गंभीर जखमी
 DIGITAL PUNE NEWS

पुणे शहरात पुन्हा गोळीबाराचा थरार; मध्यरात्री घायवळ टोळीकडून भररस्त्यात फायरींग, एक गंभीर जखमी

डिजिटल पुणे    18-09-2025 11:43:20

पुणे :पुणे शहर पुन्हा एकदा गँगवारच्या छायेत थरारलं. कोथरूड परिसरात निलेश घायवळ गँगच्या सदस्यांनी केवळ रस्ता न दिल्याच्या किरकोळ वादातून फायरिंग करून दहशत माजवली. गुरुवारी उशिरा रात्री घडलेल्या या घटनेत एक राऊंड फायर करण्यात आले.पुण्याच्या कोथरुडमध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली, ज्यात प्रकाश धुमाळ नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्याच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली असून तीन राऊंड फायर करण्यात आले. गाडीला साईड न दिल्याने हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या पुढील तपास सुरू आहे.

प्रकाश धुमाळ हा युवक या गोळीबारात गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राथमिक माहितीनुसार, कोथरूडमधील चौकात ‘रस्ता न दिल्याचा’ वाद चिघळला आणि आरोपी मयूर कुंभारे यांनी थेट गोळीबार केला, यात धुमाळ यांच्या मांडीवर गोळी लागली.

धुमाळ.याला रूग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणात मयूर कुंभारे, आनंद चांडलेकर, गणेश राऊत, मोंटी व्यास, रोहित आखाडे आणि दिनेश पाठक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले होते. मात्र, मयूर कुंभारे आणि आनंद चांडलेकर हे या दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी कोथरूड पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे आणि बाकी आरोपींचा तपास सुरू आहे.

निलेश घायवळ गँग ही पुण्यातील कुख्यात टोळींपैकी एक असून यापूर्वी खून, खंडणी, मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये या गँगचा सहभाग राहिला आहे. शांत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये किरकोळ वादातून झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.दरम्यान, पोलिसांनी तपासाला गती दिली असून हा हल्ला केवळ रस्ता न दिल्याच्या वादातून झाला की त्यामागे आणखी काही पूर्वनियोजित कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे कोथरूड परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे.


 Give Feedback



 जाहिराती