सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
  • एकनाथ शिंदेंची धंगेकरांना फायनल वॉर्निंग? म्हणाले, 'त्यांना माझ्याकडून निरोप गेलाय'
  • न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
  • सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
  • पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अन् वाद; डोक्यात वार करून संपवलं, हातावर रविराज टॅटूमुळं लागला सुगावा, इंदापुरातील कुजलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा
 DIGITAL PUNE NEWS

नागपूर हादरले! अमिताभ बच्चन सोबत चित्रपटात काम केलेल्या मुलाचा निर्घून खून

अजिंक्य स्वामी    08-10-2025 17:24:10

नागपूर – प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन सोबत भूमिका साकारलेल्या अभिनेता प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याचा ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला. ही घटना नागपूरमधील जरिपटका पोलीस स्टेशन हद्दीतील नारा परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

घटनेचा सविस्तर तपशील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू छत्री आणि त्याचा मित्र ध्रुव (लालबहादूर) साहू हे दोघे दारू सेवन करत असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात ध्रुवने बाबू छत्रीवर धारदार शस्त्राने चाकूचे वार केले. इतकेच नव्हे, तर त्याला तारांनी बांधून अर्धनग्न अवस्थेत निर्दयपणे मारहाण करण्यात आली.

स्थानिक नागरिकांना आरडाओरड ऐकू आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बाबू छत्रीला गंभीर जखमी अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आरोपी ताब्यात

या प्रकरणात मुख्य आरोपी ध्रुव साहू याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, हा खून वैयक्तिक वादातून आणि नशेच्या अवस्थेत झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनेत वापरलेले धारदार हत्यार जप्त केले असून इतर पुरावेही गोळा करण्यात येत आहेत. पुढील तपास जरिपटका पोलिस करीत आहेत.

प्रियांशु क्षत्रिय कोण होता?

प्रियांशु क्षत्रिय हा नागपूरमधील तरुण असून, नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात त्याने झोपडपट्टीतील तरुण गुन्हेगार अशी भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्याला ओळख मिळाली होती. मात्र चित्रपटातील भूमिका आणि वास्तव जीवनातील त्याची पार्श्वभूमी काहीशी सारखीच असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बाबू छत्रीवर पूर्वीही मारामारी, चोरी आणि अन्य गुन्ह्यांचे अनेक गुन्हे दाखल होते. झुंड चित्रपटात त्याने सुधारणेच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे पात्र साकारले असले, तरी वास्तवात मात्र तो गुन्हेगारी प्रवृत्तीपासून पूर्णपणे बाहेर पडू शकला नव्हता.

समाजात खळबळ

या घटनेनंतर नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. ‘झुंड’ चित्रपटातून ओळख मिळवलेला हा तरुण अशा दुर्दैवी शेवटाला पोहोचल्याने चित्रपटसृष्टीसह स्थानिकांमध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीमान केला असून आरोपीवर हत्या गुन्हा नोंदवून न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली आहे.पुढील तपास सुरू असून आरोपीला कठोर शिक्षा होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.


 Give Feedback



 जाहिराती