सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
  • एकनाथ शिंदेंची धंगेकरांना फायनल वॉर्निंग? म्हणाले, 'त्यांना माझ्याकडून निरोप गेलाय'
  • न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
  • सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
  • पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अन् वाद; डोक्यात वार करून संपवलं, हातावर रविराज टॅटूमुळं लागला सुगावा, इंदापुरातील कुजलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा
 DIGITAL PUNE NEWS

पुण्यात दारुच्या नशेत पोलीसाचा सुसाट कारनामा; सहा वाहनांना धडक, अनेक जखमी – ग्रामीण पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

डिजिटल पुणे    14-10-2025 16:43:03

पुणे  : दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने सहा वाहनांना जबरदस्त धडक देत अनेकांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  विशेष म्हणजे, या प्रकरणात आरोपी पोलीस कॉन्स्टेबलला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे हे रविवारी रात्री एका पार्टीला गेले होते. पार्टीदरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर दारूच्या नशेत असतानाच त्यांनी कार चालवली आणि पुणे–नगर महामार्गावर सहा वाहनांना जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून, काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती आणि नागरिकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

मात्र, या प्रकरणात रांजणगाव पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल केला असून, आरोपी कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांना अद्याप अटक केलेली नाही. एवढेच नव्हे तर, त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून जाणूनबुजून दडपशाही केली जात असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “जे कायद्याचे रक्षण करतात, तेच जर कायदा मोडत असतील तर सामान्य नागरिकांचा न्यायावरचा विश्वास कसा टिकणार?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

स्थानिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलीस कॉन्स्टेबलवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला तत्काळ निलंबित करून अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.


 Give Feedback



 जाहिराती