सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'आम्ही पराकाष्ठा करू, आरक्षणाला धक्का लागणार नाही'
  • मी 18 पैकी 16 निवडणुका जिंकल्या; मागच्या दाराने कधीच गेलो नाही, माझे वडील काही मंत्री नव्हते, ना खासदार होते, चिखलीकरांची अशोक चव्हाणांवर टीका
  • मोठी बातमी: भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • राज्य सरकारची शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याची तयार नसल्याने काळी दिवाळी साजरी करावी लागतेय: शरद पवार
 जिल्हा

सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्त्या प्रकरणात फास्ट ट्रॅक न्यायालयात केस चालवली जाणार -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर

डिजिटल पुणे    16-10-2025 17:39:46

सातारा :  सासपडे येथील अल्पवयीन मुलीची  निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी या प्रकरणी केस फास्ट्रॅक न्यायालयात चालवली  जाणार आहे. राज्य महिला आयोगामार्फत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शिफारस करणार असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले. चाकणकर यांनी सासपडे येथे जावून चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते.

चव्हाण कुटुंबियांना कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये, यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, असे सांगून चाकणकर म्हणाल्या, मनोधैर्य योजनेतून कुटुंबाला तातडीने मदत करावी. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही कुटुंबाला मदत मिळवून देण्यात येईल. राज्य महिला आयोग आपल्या पाठीशी असून न्यायालयात जास्तीत जास्त पुरावे सादर करुन आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

सासपडेसारखी घटना सातारा जिल्ह्यात पुन्हा घडू नये, यासाठी पोक्सोमधील जे गुन्हेगार बाहेर आहेत ते सध्या काय करीत आहेत, याची तपासणी करुन काही गैरवर्तन करीत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश चाकणकर यांनी पोलिसांना दिले.


 Give Feedback



 जाहिराती