सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवार वाड्याबाहेरच्या राड्यावरुन नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला
  • सगळ्या निवडणुका महायुतीच जिंकेल, एकनाथ शिंदेंचा विश्वास
  • लक्ष्मण हाकेंनी लोकांच्या मनात विष पेरण्याचं काम करून नये -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर सडकून टीका
  • शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
 जिल्हा

ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेता गुरुदत्त म्हणजे मानवी मनाचे कांगोरे हाताळणारे दिग्दर्शक – मंत्री ॲड. आशिष शेलार

डिजिटल पुणे    20-10-2025 10:59:39

मुंबई : मानवी मनाचे कांगोरे हाताळणारे दिग्दर्शक म्हणून अभिनेता गुरुदत्त यांची ओळख होती, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.संवेदनशील अभिनेते आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले, मुंबई येथे आज एका सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम व नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी हजर होते.या कार्यक्रमात ख्यातनाम गायक गायिका सरिता राजेश, सौम्या वर्मा, सर्वेश मिश्रा, ओंकार देवासकर, अमित काकडे, रिधीमा लाड इ. कलाकार सहभागी होते. रसिक प्रेक्षकांनी या सांगितिक कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.


 Give Feedback



 जाहिराती