सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
  • एकनाथ शिंदेंची धंगेकरांना फायनल वॉर्निंग? म्हणाले, 'त्यांना माझ्याकडून निरोप गेलाय'
  • न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
  • सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
  • पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अन् वाद; डोक्यात वार करून संपवलं, हातावर रविराज टॅटूमुळं लागला सुगावा, इंदापुरातील कुजलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा
 DIGITAL PUNE NEWS

कोल्हापुरात ऐन दिवाळीत भर रस्त्यात अघोरी प्रकार; आठ ते दहा जणांच्या तरुण टोळक्याची मध्यरात्री फिरून अघोरी पूजा

डिजिटल पुणे    23-10-2025 15:37:39

 कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावाच्या हद्दीत मध्यरात्री काही तरुणांनी अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ऐन दिवाळी सणाच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावातून अत्यंत धक्कादायक आणि अघोरी प्रकार समोर आला आहे. कागल तालुक्यातील इंगळी गावाच्या हद्दीत मध्यरात्री आठ ते दहा तरुणांनी एकत्र येऊन अघोरी पूजा केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण इंगळी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुण गावात फिरत असल्याचा आणि गावाच्या कमानीजवळ काहीतरी संशयास्पद कृत्य करत असल्याचं आढळून आले. 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आठ ते दहा तरुणांनी मध्यरात्री गावात फिरून अघोरी पूजा केल्याचं उघड झालं आहे. गावातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तरुण गावात संशयास्पद हालचाली करताना दिसत आहेत. पहाटे गावकऱ्यांनी इंगळी गावाच्या कमानीजवळ रस्त्याच्या मध्यभागीच पांढऱ्या फडक्यात ठेवलेलं जनावराचं काळीज, त्याभोवती कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीच्या झाडाचा कट केलेला भाग पाहिला. या दृश्याने ग्रामस्थांना धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्राथमिक तपासात काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार कोणत्यातरी अघोरी पूजेचा भाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या तरुणांनी गावाच्या कमानीजवळ रस्त्याच्या मध्यभागी हा अघोरी विधी केल्याचे उघड झाले आहे. पूजेच्या ठिकाणी जनावराचं काळीज पांढऱ्या फडक्यात ठेवले होते. त्याभोवती मोठ्या प्रमाणात कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीच्या झाडाचे कट केलेले भाग ठेवण्यात आले होते. पहाटेच्या वेळी ग्रामस्थांना हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

ऐन दिवाळीच्या काळात, भर रस्त्यात अशा प्रकारे जनावराच्या काळीजाचा वापर करून अघोरी पूजा केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीची भावना निर्माण झाली आहे. काहीतरी अशुभ आणि वाईट करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडला असावा, असा ग्रामस्थांना संशय आहे. या प्रकारामुळे इंगळी गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आठ ते दहा संशयित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. हे तरुण नेमके कोण आहेत? त्यांनी कोणत्या उद्देशाने ही अघोरी पूजा केली? यामागे अन्य काही कारण आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं काम पोलीस करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती