सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
  • एकनाथ शिंदेंची धंगेकरांना फायनल वॉर्निंग? म्हणाले, 'त्यांना माझ्याकडून निरोप गेलाय'
  • न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
  • सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
  • पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अन् वाद; डोक्यात वार करून संपवलं, हातावर रविराज टॅटूमुळं लागला सुगावा, इंदापुरातील कुजलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा
 DIGITAL PUNE NEWS

निलेश घायवळला मोठा दणका, अखेर पासपोर्ट रद्द; ऑर्डर जारी

डिजिटल पुणे    23-10-2025 16:17:55

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची ऑर्डर जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. यावेळी पासपोर्ट रद्द करण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती.

घायवळ याने खोटी माहिती देखील पासपोर्ट काढला अन् परदेशी फरार झाला आहे. निलेश घायवळने गंभीर गुन्ह्यांमुळे पासपोर्ट मिळणे अवघड असल्याचे लक्षात येताच बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. पोलिसांनी तपास केल्यानंतर हे पुरावे पासपोर्ट ऑफिसला पाठवले होते. त्यानंतर कार्यलयाकडून कारवाई करत निलेश घायवाळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. ऑर्डरमध्ये विविध मु्द्दे नमुद करण्यात आले आहेत.

पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाने घायवळला तात्काळ पासपोर्टसाठीचे इतर निकष वापरुन 16 जानेवारी 2020 ला पासपोर्ट मंजुर केला आणि घायवळला पासपोर्ट मिळाला. त्यानंतर 2021 मध्ये निलेश घायवळला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याने या पासपोर्टचा आधार घेतला अन् फरार झाला आहे. 2022 मध्ये घायवळला त्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाला. तो देताना न्यायालयाने घायवळला त्याचा पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र घायवळने त्याचा पासपोर्ट जमा केला नव्हता, अशी माहिती मिळाली आहे.

घायवळ पासपोर्ट प्रकरणावरून पोलिसांवर टीका होत असतानाच पुणे पोलिसांनी या दरम्यान न्यायलयाकडे घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याचा विनंती अर्ज दाखल केला होता. घायवळवर गेल्या तीस काही दिवसांत तब्बल पाच गुन्हे नोंद झाले आहेत, कोथरूड परिसरात झालेला गोळीबार, वाहनांवर खोटे नंबर लावणे, घरातून शस्त्र सापडणे, खंडणी आणि धमकी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश यात आहे. २०२१ मध्येही घायवळविरोधात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे होता.

'घायवळने परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट कसा मिळवला, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पासपोर्ट काढताना त्याने 'घायवळ' ऐवजी 'गायवळ' असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली. त्याने अहिल्यानगरमधील पत्त्याचा वापरून पासपोर्ट काढला, पुणे पोलिसांनी तेथे त्याने दिलेल्या त्या आहिल्यानगरच्या पत्त्यावर छापा टाकला. मात्र, पासपोर्ट मिळविण्यासाठी दिलेला पत्ता खोटा असल्याचे उघडकीस आले, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.घायवळने पासपोर्टसाठी अर्ज करताना प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्या प्रतिज्ञापत्रात त्याने स्वतःविरुद्ध राज्यात किंवा इतर कोणत्याही परराज्यात कोणताही गुन्हा नोंदलेला नाही, असा दावा केला होता. 


 Give Feedback



 जाहिराती