सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
  • एकनाथ शिंदेंची धंगेकरांना फायनल वॉर्निंग? म्हणाले, 'त्यांना माझ्याकडून निरोप गेलाय'
  • न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
  • सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
  • पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अन् वाद; डोक्यात वार करून संपवलं, हातावर रविराज टॅटूमुळं लागला सुगावा, इंदापुरातील कुजलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा
 व्यक्ती विशेष

मुरलीधर मोहोळ मीडियासमोर खोटं बोलले? रवींद्र धंगेकरांनी थेट पुरावे सादर करत केला हल्लाबोल!

डिजिटल पुणे    25-10-2025 14:18:48

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल (शुक्रवारी) माध्यमांशी बोलताना दिलेल्या उत्तरानंतर धंगेकरांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत मोहोळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.माझ्यावर एकही गुन्हा नाही, असे त्यांनी धडधडीत खोटे ऑन कॅमेरा सांगितले होते .पण हा घ्या पुरावा त्यांच्यावर ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील दाखल आहे असे शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी आज म्हटले आहे.धंगेकरांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत मोहोळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

धंगेकरांनी पोस्ट करत म्हटलं आहे की — “अतिशय सुसंस्कृत आणि सरळमार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटं बोलतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. काल त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. पण त्यांच्या इलेक्शन एफिडेव्हिटमधील प्रतांमध्ये स्पष्ट दिसतं की त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत — अगदी ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हाही!”

धंगेकरांनी त्यांच्या पोस्टसोबत मोहोळ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील काही पाने जोडली असून, त्यामध्ये नोंद असलेल्या प्रकरणांचा उल्लेख केला आहे. त्यांनी पुढे म्हटलं की —“राजकीय कार्यकर्ता म्हटलं की काही गुन्हे आंदोलनातून होत असतात, हे मान्य आहे. पण स्वतःवर एकही गुन्हा नाही असं सांगत इतरांची बदनामी करणं हे अशोभनीय आहे. अशा वक्तव्यांमुळे माध्यमांचं आणि पुणेकरांचंही दिशाभूल करणं होतं.”त्याचबरोबर धंगेकरांनी सूचक इशारा देत म्हटलं आहे की, “थेट जमीन हडप प्रकरणात सहभाग असलेली दोन प्रकरणं लवकरच मी सार्वजनिक करणार आहे.”

दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी काल माध्यमांशी बोलताना धंगेकरांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटलं होतं —“ते रोज बोगस ट्विट करतात आणि तुम्ही ते दाखवता. त्यांच्या प्रत्येक दाव्याचा पुरावा मागा. महापालिकेची गाडी मी वापरली नाही; लोकसभा निवडणुकीत मी माझ्या प्रतिज्ञापत्रात स्वतःची गाडी आणि इंधन वापरल्याचं नमूद केलं आहे. हा बोगस कार्यक्रम आहे. माझ्यावर एकही गुन्हा नाही, त्यांच्यावर मात्र १० गुन्हे दाखल आहेत.”या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुण्याच्या राजकारणात चांगलाच खळबळ माजली असून, आगामी काळात दोन्ही नेते आणखी कोणते पुरावे आणि प्रत्युत्तरे समोर आणतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती