सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
  • एकनाथ शिंदेंची धंगेकरांना फायनल वॉर्निंग? म्हणाले, 'त्यांना माझ्याकडून निरोप गेलाय'
  • न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
  • सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
  • पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अन् वाद; डोक्यात वार करून संपवलं, हातावर रविराज टॅटूमुळं लागला सुगावा, इंदापुरातील कुजलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा
 शहर

पुण्यात सूर संजीवन म्युझिक थेरपी प्रशिक्षण ; डॉ. पं. शशांक कट्टी यांची पत्रकार परिषदेत माहिती

डिजिटल पुणे    25-10-2025 14:20:28

पुणे : सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टतर्फे पुण्यात सुर संजीवन म्युझिक थेरपी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्ट चे संस्थापक डॉ. पं. शशांक कट्टी  यांनी पत्रकार परिषदेत दिली.पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे ही पत्रकार परिषद २५ ऑक्टोबर रोजी झाली. हा २०० तासांचा एक वर्षाचा ऑफलाइन पदविका (डिप्लोमा) कोर्स असून, ९ नोव्हेंबर २०२५ पासून कोथरूड येथे सुरू होणार आहे. या कोर्समध्ये संगीताच्या माध्यमातून विविध आजारांवर उपचार करण्यासाठी सुरावली आणि तराणा मंत्र शिकवले जातील.डॉ.पं.शशांक कट्टी (डॉक्टरेट इन म्युझिक थेरपी, आकाशवाणीचे टॉप ग्रेड कलाकार) हे प्रमुख प्रशिक्षक असतील. तसेच आयुर्वेद, शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र विषयातील तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करतील.वर्ग शनिवार आणि रविवार या दिवशी होतील.

कोर्स सुरू होण्यापूर्वी विनामूल्य सेमिनार रविवार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता सिद्धार्थ टॉवर्स, कोथरूड येथे होणार आहे. नाव नोंदणीसाठी  ९८२००४६९२०, ९९६००६१०२९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. हा कोर्स संगीत आणि आरोग्य यांचा सुंदर संगम साधणारा उपक्रम आहे.ही थेरपी शिकू इच्छिणाऱ्यांचे शिक्षण  कमीत कमी दहावी असावे.संगीताचे प्राथमिक ज्ञान घेतलेल्याना, संगीत उपचाराची जुजबी माहिती असणाऱ्यांना,डॉक्टर्स, वैद्य, अथवा कुठलाही वैद्यकीय वा पर्यायी र्कोर्स केलेल्याना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाईल,असे डॉ.कट्टी यांनी सांगितले. या थेरपीच्या प्रसारासाठी www.sursmt.com हे संकेतस्थळ सुरु करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. 


 Give Feedback



 जाहिराती