सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
  • एकनाथ शिंदेंची धंगेकरांना फायनल वॉर्निंग? म्हणाले, 'त्यांना माझ्याकडून निरोप गेलाय'
  • न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
  • सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
  • पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अन् वाद; डोक्यात वार करून संपवलं, हातावर रविराज टॅटूमुळं लागला सुगावा, इंदापुरातील कुजलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा
 व्यक्ती विशेष

मी चार वेळा आमदार राहिलो आता बस झालंं;आता कधीतरी...; मंत्री संजय शिरसाटांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत?

डिजिटल पुणे    25-10-2025 16:13:46

मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, “मी चार टर्म आमदार राहिलो आहे, पुढे राहीन की नाही माहीत नाही.” राजकारणात कधी थांबले पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीने ठरवले पाहिजे, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले.संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

मंत्री संजय शिरसाट यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, "मी चार टर्म आमदार राहिलो आहे, पुढे राहीन की नाही माहीत नाही." राजकारणात कधी थांबले पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीने ठरवले पाहिजे, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले. शिरसाट पुढे म्हणाले की, राजकारणात कोणीही अमृत पिऊन आलेला नाही. जोपर्यंत आपले हातपाय चालतात, तोपर्यंत चांगले काम करावे. “प्रत्येक वेळेला आपण अमृत पिऊन आलेलो आहोत, मीच कायम तिथे राहीन असं काही नसतं," असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरसाट पुढे म्हणाले की, राजकारणात कोणीही अमृत पिऊन आलेला नाही. जोपर्यंत आपले हातपाय चालतात, तोपर्यंत चांगले काम करावे. “प्रत्येक वेळेला आपण अमृत पिऊन आलेलो आहोत, मीच कायम तिथे राहीन असं काही नसतं,” असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या कालच्या भाषणाचा संदर्भ देत, त्यांनी “आता बस झालं” असे म्हटले होते. ते दहा वर्षे नगरसेवकही राहिले आहेत. एक प्रसंग सांगताना, त्यांनी एका आयुक्तांचा उल्लेख केला जो २०४३ पर्यंत मुख्य सचिव होईल, परंतु “मी २०४३ ला थोडी राहणार आहे? इतकी वर्षे जगण्याची माझी इच्छा नाही,” असे त्यांनी विनोदाने सांगितले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

संजय शिरसाट पुढे म्हणाले की, यासाठी कुणाचा राजकीय दबाव, कोणी बोलत आहे किंवा वैतागून मी काही बोलत आहे अशातला काहीच भाग नाही. मी आता 64 वर्षांचा आहे. लवकरच मी 65 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. स्वप्न पाहायला आपण काहीही पाहू शकतो.मला 2029 पर्यंतचा काळ आहे. 2029 साली मी 69 वर्षांचा होईल. त्यावेळेस काय करावे याचा विचार तर केलाच पाहिजे ना. राजकारण हा सेवेची संधी असलेला भाग जरी असला तरी आता माझ्याकडे असलेले खाते मोठे आहे. मी चांगले काम करत आहे. त्यामुळे मला आणखीन काहीतरी पाहिजे किंवा माझ्या काही अपेक्षा आहेत असे काही नाही. माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानी आहे, असे देखील त्यांनी म्हटले. 


 Give Feedback



 जाहिराती