सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी वर्तनाचा संतापजनक प्रकार
  • मोठी बातमी: अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय
  • : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले,
  • पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले
  • वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या नवऱ्याकडून कौतुकाची उधळण
  • पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर
 DIGITAL PUNE NEWS

श्रेयस अय्यर आयसीयूमध्ये दाखल — गंभीर दुखापतीमुळे उपचार सुरू

डिजिटल पुणे    27-10-2025 14:34:45

सिडनी : भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात फलंदाजीदरम्यान त्याच्या बरगडीवर चेंडू लागला होता. दुखापत गंभीर असल्याने आतून मोठा रक्तस्त्राव झाल्याचे वृत्त आहे. तत्काळ वैद्यकीय तपासणीनंतर त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अय्यरच्या प्रकृतीबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 168 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला क्लीन स्वीपपासून वाचवले. मात्र, या सामन्यात फिल्डिंगदरम्यान संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर श्रेयस अय्यर पुन्हा मैदानात आलाच नाही. त्याला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. यादरम्यान आता श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. 

सामन्यादरम्यान अय्यरच्या बरगडीवर चेंडू लागून तो वेदनेने मैदानाबाहेर गेला होता. सुरुवातीला साधी दुखापत वाटली असली, तरी पुढील तपासणीत अंतर्गत रक्तस्त्राव (internal bleeding) झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार सुरू करण्यात आले आहेत.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरला बरगडीला दुखापत झाली होती. सध्या श्रेयस अय्यरला सिडनीच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. बरगडीच्या दुखापतीमुळे अजूनही अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, अय्यरवर सध्या आयसीयूमध्ये विशेष देखरेखीखाली उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. तथापि, पूर्णपणे बरे होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात.भारतीय संघ व्यवस्थापनाने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही, मात्र संघातील सूत्रांनी सांगितले की, अय्यरला सध्या विश्रांतीची गरज आहे आणि पुढील काही मालिका तो गमावण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी श्रेयस अय्यरला एकदिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दुसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावून उत्तम कामगिरी केली होती. मात्र, आता या दुखापतीमुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत काही काळासाठी खंड पडू शकतो.


 Give Feedback



 जाहिराती