सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात एकाच खोलीत राहणारे सगळे मित्र झाले सरकारी अधिकारी, कराडच्या सुरज पडवळ यांची राज्य सेवेत क्लास-वन पदावर निवड
  • : बिबट्याला जगवायचं की माणसाला, ते ठरवा! गावकऱ्यांचा राज्य सरकाला अल्टिमेटम, मंत्रालयात महत्त्वाची बैठक
  • सकाळपासून पाळत अन् दुपारी वाजवला गेम, सहा महिन्यापूर्वी गणेश काळेला संपवण्याचा प्रयत्न फेल, पोलीस तपासात मोठी माहिती समोर
  • भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी वर्तनाचा संतापजनक प्रकार
  • मोठी बातमी: अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय
  • : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले,
  • पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले
  • वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या नवऱ्याकडून कौतुकाची उधळण
  • पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर
 DIGITAL PUNE NEWS

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात धक्कादायक घटना ! कैद्याने कारागृहातच संपवलं जीवन; कारागृह प्रशासनात खळबळ

डिजिटल पुणे    27-10-2025 15:21:11

नाशिक : नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका बंदीवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 26 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. शिवदास भालेराव (वय 58, कैदी क्रमांक यूटी-802, रा. सिन्नर) असे मृत्युमुखी पडलेल्या बंदीवानाचे नाव आहे.

भालेराव याला एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर तो जून 2024 पासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.

रविवारी दुपारच्या सुमारास भालेराव याने कारागृहातील एका ठिकाणी कशाच्या तरी साहाय्याने गळफास घेतल्याचे कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आले. तातडीने त्याला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि कारागृह प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील काही कैदी सुरक्षेचा फज्जा उडवत अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये मातीच्या चिलीमचा वापर करत अमली पदार्थ ओढताना दिसणारे दृश्य, तसेच कैद्यांकडून मोबाईल फोनवर शूट केलेल्या रील्स व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकाराची दखल घेत नाशिकरोड पोलिसांनी 5 ते 6 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासात हे व्हिडीओ मागील वर्षीचे असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, इतक्या गंभीर प्रकारानंतरही कारागृह प्रशासनाकडून वर्षभरात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, हे विशेष लक्ष वेधणारे ठरले होते. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.


 Give Feedback



 जाहिराती