सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी वर्तनाचा संतापजनक प्रकार
  • मोठी बातमी: अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय
  • : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले,
  • पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले
  • वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या नवऱ्याकडून कौतुकाची उधळण
  • पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर
 DIGITAL PUNE NEWS

पुण्यात ‘अल-कायदा’चे साहित्य बाळगणाऱ्या उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक; बॉम्ब बनवण्याची माहिती असलेले मासिक सापडले

डिजिटल पुणे    29-10-2025 15:17:19

पुणे  : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) पुण्यात मोठी कारवाई करत एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. आरोपी झुबेर हंगरगेकर (वय ३५, रा. कोंढवा, मूळ सोलापूर) याच्यावर अल-कायदाशी संबंध असल्याचा आरोप असून, त्याच्याकडे दहशतवादी संघटनेचे प्रचार साहित्य आणि बॉम्ब बनवण्याच्या पद्धतींची माहिती सापडली आहे.

एटीएसच्या तपासानुसार झुबेरकडे ‘अल-कायदा इन्स्पायर’ या मासिकातील गोळीबार आणि स्फोटक तयार करण्यासंबंधी माहिती, तसेच दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले. तो एका नामांकित आयटी कंपनीत उच्च पगाराच्या पदावर कार्यरत होता.

 रेल्वे स्टेशनवर कारवाई

एटीएसने सोमवारी (दि. २७ ऑक्टोबर) पुणे रेल्वे स्थानक परिसरात झुबेरला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत असलेल्या एका मित्रालाही संशयाच्या आधारे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने झुबेरला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 घरातून आक्षेपार्ह साहित्य जप्त

झुबेरच्या घरातून संगणक, लॅपटॉप आणि अनेक संवेदनशील दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात त्याचा अल-कायदाशी संपर्क स्पष्ट झाला असून, तो काही तरुणांना कट्टरपंथी विचारांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका आहे.

 पूर्वीच्या कारवायांशी संबंध

९ ऑक्टोबर रोजी पुण्यातील कोंढवा, वानवडी आणि खडकी भागात एटीएसने छापेमारी करत १८ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी झुबेरच्या लॅपटॉपमधून आयईडी बनवण्याचा डेटा मिळाल्याचे समोर आले. तसेच सातारा आणि कोल्हापूर भागात त्याने बॉम्बस्फोटाचे प्रशिक्षण घेतल्याचेही पुरावे तपासात आढळले आहेत.

 संयुक्त कारवाईमुळे मोठा धोका टळला

एटीएस आणि रेल्वे पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा मोठा धोका टळला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “झुबेर अल-कायदाच्या सदस्यांशी कसा संपर्क साधला आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.”ही कारवाई एटीएसच्या दक्षतेचे द्योतक असून, पुणे शहर आणि राज्याच्या सुरक्षेसाठी ही मोठी यशस्वी कारवाई मानली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती