सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गोखले बिल्डर्सने व्यवहार रद्द केला पण धंगेकर पिच्छा सोडेनात, जैन बोर्डिंग डीलप्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार देणार
  • : श्रीमंत अन् सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडूंचा फॉर्म्युला
  • पुण्यात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक, बॉम्ब तयार करण्याची माहिती असणारं पुस्तक सापडलं
 जिल्हा

लोककलांच्या जतन व संवर्धनासाठी समिती स्थापन करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

डिजिटल पुणे    29-10-2025 17:22:07

मुंबई : राज्यातील लोककला, लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलांच्या जतन व संवर्धनासाठी  समिती स्थापन करावी, अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.विधानभवनात लोककलावंतांच्या समस्या, आव्हाने आणि उपाययोजना या विषयावर आढावा बैठक झाली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, सुशांत शेलार, लोककलावंत नंदेश उमप, डॉ. भावार्थ देखणे आणि खंडूराज गायकवाड उपस्थित होते.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात विविध लोककला हा अमूल्य वारसा आहे. मात्र, या कलांना आधुनिक काळात आवश्यक प्रोत्साहन आणि संरक्षण मिळणे गरजेचे आहे.”सांस्कृतिक कार्य विभागाने लोककलांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी. या समितीमार्फत लोककलांचे संहितीकरण, संकलन, तसेच लोककलांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय स्थापनेचे काम हाती घेता येईल. तसेच विविध लोककला महोत्सव राज्यभरात व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचे नियोजनही या समितीमार्फत करता येईल.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले की, लोककलावंतांच्या समस्या, आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठी समितीची स्थापना आवश्यक आहे. या समितीच्या माध्यमातून शिक्षण विभागाशी समन्वय साधून लोककला विषयक प्रमाणपत्र कोर्सेस राबविण्याचे नियोजन करण्यात येईल. तसेच लोककलावंतांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.बैठकीत उपस्थित लोककला अभ्यासक व लोककलावंतांनीही विचार मांडले.


 Give Feedback



 जाहिराती