उरण : उरण तालुक्यात अनेक ठिकाणी आर्थिक फसवणूकिचे प्रकार मोठया प्रमाणात होत आहेत. तसेच इतर वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात होणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व समाजात जनजागृती करण्यासाठी उरण पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. उरण पोलीस ठाणे तर्फे विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे.दिनांक २८/१०/२०२५ रोजी उरण पोलीस ठाणे हद्दीतील सराडे आणि पिरकोन या गावामध्ये कॉर्नर मिटिंग घेऊन विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. जनतेच्या सहभागातून सीसीटीव्ही बसविणे, दिवसा व रात्रौपाळी घरफोडी, चैन स्नॅचिंग, बतावणी, सोने चांदी उजळवून देतो वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रीट क्राईम/ अश्या प्रकारचे गुन्हे करणारे या पासून सतर्क राहणे, सायबर फ्रॉड, ऑनलाईन फ्रॉड, गेमिंग फ्रॉड, क्रिप्टॊ करंसी फ्रॉड, सेक्सटोर्शन फ्रॉड, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड अश्या प्रकारचे गुन्हे पासून सावध राहावे, जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवून ठेवी स्वीकारणारे व्हाईट कलर चीटर अश्या प्रकारचे गुन्हे बाबत माहिती दिली.गावच्या दर्शनी भागात, वरदळीच्या ठिकाणी, ग्रामपंचायत कार्यालय येथे विविध विषयासंदर्भात पोस्टर चिटकावण्यात आलेले आहेत.अशी माहिती हनीफ मुलाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे, नवी मुंबई यांनी दिली आहे.