पुणे : ‘सिल्क वीव्स एक्स्पो – वेडिंग एडिशन २०२५’ हे वस्त्र प्रदर्शन भरवले जात आहे. भारतातील विविध राज्यांतील हातमाग आणि रेशीम वस्त्रांची समृद्ध परंपरा एकाच छताखाली अनुभवता येणार आहे. हे प्रदर्शन ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान शिवाजी पार्क,दादर येथील स्काऊट हॉलमध्ये दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील.
‘द सिल्क्स अँड हँडलूम्स ऑफ इंडिया कलेक्टिव्ह’ यांच्या वतीने आयोजित या एक्स्पोमध्ये देशभरातील नामांकित विणकर आणि शिल्पकार त्यांची उत्कृष्ट रेशीम निर्मिती प्रदर्शित करणार आहेत. कांचीवरम, बनारसी, पैठणी, पटोला यांसारख्या पारंपरिक साड्या आणि विवाहसोहळ्यांसाठी खास डिझाइन्स याठिकाणी पाहायला मिळणार आहेत.या प्रदर्शनाचा उद्देश पारंपरिक हातमाग कलांना प्रोत्साहन देत शहरी ग्राहकांना थेट ग्रामीण कारागिरांशी जोडणे असा आहे. विवाह आणि सणासुदीच्या खरेदीसाठी हे प्रदर्शन आकर्षक ठरणार आहे.प्रवेश आणि पार्किंग दोन्ही विनामूल्य आहेत.