सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर, गोळी झाडल्यानंतर पोलिसांचं प्रत्युत्तर, छातीत गोळी लागली
  • धर्मादाय आयुक्तांकडून 4 तारखेचा व्यवहार रद्द; अखेर गोखले बिल्डर्सकडून जैन बोर्डिंग ट्रस्टला मिळाली
  • मोठी बातमी : मुंबईत तब्बल 20-22 मुलांना ओलीस ठेवलं; रोहित आर्यचं कृत्य, व्हिडीओ बनवून मोठ्या मागण्या
  • ताम्हिणी घाटात भीषण अपघात : चालत्या कारच्या सनरुफमधून दगड घुसला, महिलेचा जागीच मृत्यू
  • गोखले बिल्डर्सने व्यवहार रद्द केला पण धंगेकर पिच्छा सोडेनात, जैन बोर्डिंग डीलप्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार देणार
 जिल्हा

ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण पदे शिक्षक संवर्गात समावेशासाठी प्रस्ताव तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

डिजिटल पुणे    30-10-2025 15:49:56

मुंबई – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक सोबत संलग्नित महाविद्यालयातील ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण ही पदे शिक्षक संवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.मंत्रालयात  याविषयी झालेल्या बैठकीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील इतर विद्यापीठामध्ये ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण यांना शिक्षक संवर्गात समाविष्ट केले आहे. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी अशाच नियमानुसार कार्यवाही व्हावी. यासाठी केंद्रीय वैद्यकीय परिषदेकडे प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.


 Give Feedback



 जाहिराती