मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हा कार्यालयासाठी स्वतंत्र कार्यालयीन जागा भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी खाजगी इमारतींच्या मालकांनी १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मुंबई शहर यांनी केले आहे.
ज्या खासगी इमारतींच्या मालकांकडे २५०० चौ.फुट (मुंबई शहर) आणि २५०० चौ.फुट (मुंबई उपनगर) इतकी स्वतंत्र क्षेत्रफळाची जागा उपलब्ध आहे आणि ती जागा शासनाच्या प्रचलित नियमांनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग निश्चित करेल त्या भाडेकरारावर देण्यास तयार आहेत, अशा मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील खासगी इमारतीच्या मालकांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मुंबई शहर, प्रशासकीय इमारत, भाग-१, चौथा मजला,आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई – ४०० ०७१ या कार्यालयाशी दि. १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.