सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी वर्तनाचा संतापजनक प्रकार
  • मोठी बातमी: अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय
  • : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले,
  • पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले
  • वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या नवऱ्याकडून कौतुकाची उधळण
  • पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर
 शहर

गर्भाशयमुख कर्करोगावरील लसीकरणासाठी सिरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

डिजिटल पुणे    31-10-2025 13:08:38

पुणे : गर्भाशयमुख कर्करोगावर लसीद्वारे प्रतिबंध घडवून आणण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे भेट देऊन संस्थेतील चालू संशोधन, लसनिर्मिती प्रक्रिया आणि भविष्यातील प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि गर्भाशयमुख कर्करोगावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्याच्या उपक्रमाविषयी माहिती घेतली.

श्री. आबिटकर म्हणाले, “गर्भाशयमुख कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाबरोबरच जनजागृती, वेळेत निदान आणि उपचार हेही तितकेच महत्त्वाचे घटक आहेत. राज्यात महिलांमध्ये गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आणि तपासणी मोहिमा आयोजित करणे अत्यावश्यक असल्याचेही श्री. आबिटकर यांनी सांगितले.डॉ. पूनावाला म्हणाले, “गर्भाशयमुख कर्करोग हे महिलांमध्ये आढळणारे प्रमुख आरोग्य आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ‘एचपीव्हीलस विकसित करण्याचे काम करत आहे.श्री. आबिटकर सिरम इन्स्टिट्यूटच्या भेटीदरम्यान संस्थेचे संशोधन विभाग, लसनिर्मिती युनिट आणि प्रयोगशाळा यांचीही  यांनी पाहणी केली. यावेळी डॉ. सायरस पूनावाला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती