सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी वर्तनाचा संतापजनक प्रकार
  • मोठी बातमी: अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय
  • : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले,
  • पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले
  • वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या नवऱ्याकडून कौतुकाची उधळण
  • पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर
 जिल्हा

रायगड जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना सन्मान आणि एकजुटीचा संदेश;कॉंग्रेसमध्ये सन्मानाने राहा : महेंद्रशेठ घरत

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    03-11-2025 11:34:11

उरण : “राजकारणात सध्या कुणाचा पायपोस कुणाला नाही, भाजपमध्ये आमदारालाही बोलता येत नाही, त्यांची चिडीचूप अशी अवस्था आहे. मात्र काँग्रेसमध्ये सन्मान आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची मुभा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो, कॉंग्रेसमध्ये स्वाभिमानाने आणि सन्मानाने राहा,” असे प्रतिपादन काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी शेलघर येथे केले.शनिवारी (ता. १) शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाज मंदिरात रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती.

यावेळी निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करताना महेंद्रशेठ घरत म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुकांनी अर्ज भरावेत. सर्व अर्जांची छाननी करूनच उमेदवारी जाहीर केली जाईल.” त्यांनी पक्षातील शिस्त, निष्ठा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या तीन घटकांवर विशेष भर दिला.यावेळी रायगड जिल्हा प्रभारी राणी अग्रवाल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन  करताना म्हणाल्या, “कॉंग्रेसच्या सध्याच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांना ताकद मिळाली आहे. तालुका अध्यक्ष हे संघटनाचे केंद्रस्थान आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उमेदवार सक्षम, जनाधार असलेला आणि समाजाशी नाते जपणारा हवा. परिस्थितीनुसार कॉंग्रेस स्वबळावरही लढण्यास तयार आहे. कॉंग्रेस हा एक परिवार आहे  आणि प्रत्येक सदस्य त्याचा अविभाज्य भाग आहे.”यावेळी उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी भाजपवर थेट टीका करत म्हटले, “भाजपमुळेच महागाईचा भस्मासुर वाढलाय. सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.

अशा परिस्थितीत काँग्रेसशिवाय पर्याय नाही, अशा भावना जनतेत आहेत.”या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांतील घोळ, निवडणुकीची तयारी आणि उमेदवारीबाबत आपली मते मांडली. “तिकीट मिळो वा न मिळो, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत राहू,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांबद्दल उत्साह आणि चैतन्य जाणवत होते.या बैठकीला रायगड जिल्हा प्रभारी राणी अग्रवाल, प्रदीप राव (प्रभारी अलिबाग विधानसभा), डॉमिनिक डिमेलो (प्रभारी उरण विधानसभा), मनोज कांबळे (प्रभारी पेण विधानसभा), अशोक मोरे (प्रभारी श्रीवर्धन विधानसभा), सुरेश काटकर (प्रभारी महाड विधानसभा), सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, ऍड.श्रद्धा ठाकूर, डॉ. मनीष पाटील, महिला जिल्हाध्यक्ष रेखा घरत, नंदराज मुंगाजी, महाराष्ट्र फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अखलाक सिलोत्री, निखिल ढवळे  व तालुका अध्यक्ष, तसेच रायगड जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती