सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी वर्तनाचा संतापजनक प्रकार
  • मोठी बातमी: अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय
  • : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले,
  • पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले
  • वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या नवऱ्याकडून कौतुकाची उधळण
  • पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर
 DIGITAL PUNE NEWS

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतिमंद विद्यालयातील अमानवी प्रकार; केअरटेकर आणि शिपाईवर गुन्हा दाखल

डिजिटल पुणे    03-11-2025 17:05:59

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात काही केअरटेकर आणि शिपाई यांनी मतिमंद विद्यार्थ्यांवर बेदम मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. कुकरच्या झाकणांनी, लाथा-बुक्क्यांनी या निरागस लेकरांना केल्याचा प्रकार प्रकाशात आला असून, या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या विद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी गतिमंद विद्यार्थ्यांवर कुकरच्या झाकणांनी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या अमानवी कृत्यामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

देवाने निरागसता दिलेली, पण नियतीने दु:ख दिलेली ही लेकरं  ज्यांना आपली वेदना शब्दांत सांगता येत नाही  त्यांच्यावरच राक्षसी अत्याचार झाले. विद्यार्थ्यांना आधार देणारे हातच जर त्यांना तुडवू लागले, तर माणुसकीचा अंत झाला की काय, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.

आरोपी कोण?

या प्रकरणात दीपक इंगळे आणि प्रदीप देहाडे ही दोन नावे समोर आली आहेत.दीपक इंगळे : मागील 10 वर्षांपासून विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत. एका विद्यार्थ्याला कुकरच्या झाकणाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल व निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तो संस्थाचालकाचा नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली आहे.प्रदीप देहाडे : काळजीवाहक म्हणून काम करत होता. विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं फुटेज समोर आलं असून, त्याच्यावरही गुन्हा दाखल व निलंबन करण्यात आलं आहे.

पोलीस आणि प्रशासनाची भूमिका

या घटनेनंतर चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे. संस्थेतील इतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाचीही चौकशी करण्यात येत आहे.

मंत्री अतुल सावे यांची तीव्र प्रतिक्रिया

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले  “ज्यांना आपली वेदना सांगता येत नाही, अशा मुलांच्या सांभाळासाठी सरकारने संस्था उभ्या केल्या. पण जर या संस्था छळछावण्या बनत असतील, तर आपण समाज म्हणून अपयशी ठरलो आहोत. गतिमंद मुलांना सहानुभूती नव्हे, तर सन्मान आणि सुरक्षितता हवी आहे. त्यांच्या अश्रूंवर सरकार, समाज आणि आपली मने जागी झाली पाहिजेत... नाहीतर माणुसकीचं कुकरचं झाकण बंद होईल कायमचं!”

 समाजाचा सवाल

या प्रकरणामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर आणि संस्थेच्या देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.ज्यांच्या हातात जबाबदारी होती, तेच जर निर्दयी बनले, तर ही फक्त काही लेकरांची नव्हे — तर माणुसकीच्या अस्तित्वाची वेदनादायक हार आहे.


 Give Feedback



 जाहिराती