पुणे : पुण्यातील गौरीकैलास ज्योतिष संस्था यांच्यावतीने वार्षिक ज्योतिष महोत्सवाचे आयोजन दि.९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे सहा दरम्यान हॉटेल प्रेसिडेंट (कर्वे रस्ता ) येथे करण्यात आले आहे. या दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमात देशभरातील नामवंत ज्योतिषी, वास्तुशास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. गौरीकैलास ज्योतिष संस्थेचे संस्थापक सौ. गौरी केंजळे,कैलास केंजळे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . कार्यक्रमाचे उद्घाटन अनिल चांदवडकर(नाशिक) यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी पं. विजय जकातदार असतील. स्वागताध्यक्ष म्हणून वेदमूर्ती पं. नंदकुमार जोशी यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये अतुलशास्त्री भगरे गुरुजी(नाशिक) यांचे मार्गदर्शन तसेच विशेष अतिथी म्हणून दत्तप्रसाद चव्हाण, वास्तुमहर्षी रमेश पलंगे, पं. दिलीप अवस्थी, सौ. पुष्पलता शेवाळे, डॉ. सौ. जयश्री बेलसरे, सौ. जानकी पाचर्णे, रोहित वर्मा आणि सौ. शुभांगिनी पांगारकर यांचा सहभाग असेल. कै. मनोहर केंजळे स्मृती पुरस्कार २०२५ डॉ. चंद्रकांत शेवाळे (दादा )यांना प्रदान केला जाणार आहे.
दिवसभरात चार सत्रांमधून विविध विषयांवर व्याख्याने आणि चर्चासत्रे घेण्यात येतील. पहिल्या सत्रात सौ. कविता काळे ‘झटपट पैसा कसा बघाल’, निलेश खरे ‘कस्पल इंटरलिंक’, सौ. सुषमा पलंगे ‘वास्तूतील अंतर्गत रचना’ आणि गणेशशास्त्री शुक्ल ‘कवडीशास्त्र’ या विषयांवर मार्गदर्शन करतील. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अपर्णा गोरेगावकर करतील.दुसऱ्या सत्रात प्रदीप पंडित ‘अष्टकवर्ग कालनिर्णय’, अरुण खंदारे ‘ग्रहगतींचे गणित’ आणि सौ. पल्लवी चौहान ‘जुळ्या मुलांच्या कुंडल्या’ या विषयांवर चर्चा करतील.
तिसरे सत्र ‘गोष्टी सांगू युक्तीच्या’ या मनोरंजक शैलीत होईल. कांतीलाल मुनोत,सौ. गौरी केंजळे,ॲड.सुनिता पागे, ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार,डॉ. सौ शिल्पा अग्निहोत्री, डॉ.निलेश बी कुलकर्णी सहभागी होतील.
तर चौथे सत्र ‘पौष्टिक खिचडी’ या नावाने विविध आधुनिक व पारंपरिक विषयांचा संगम घडवेल. यात वास्तूतील ऊर्जा, कृष्णमूर्ती पद्धत, पुनर्जन्म, उपाय-उपासना, ग्रहांची युती इत्यादी विषयांवर एड.मालती शर्मा,डॉ.स्मिता गिरी,जितेंद्र वझे,मुग्धा पत्की,डॉ.श्यामला वाघ,संदीप सवाई,सौ.वैशाली साठे,सौ.अपर्णा पैठणकर,प्रसन्न भिडे विचार मांडले जातील. सायंकाळी समारोप सत्रात आदिनाथ साळवी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण करतील.
प्रमाणपत्र वितरण आणि विद्यार्थ्यांचे मनोगत या कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप होईल.हा दिवस ज्योतिषशास्त्र, वास्तु आणि अध्यात्माच्या रसिकांसाठी ज्ञान, प्रेरणा आणि उत्साहाचा अनोखा मिलाफ ठरणार आहे. या सर्वांसाठी गौरीकैलास ज्योतिष्य संस्था पुणे यांचा हा उपक्रम एक संस्मरणीय आणि ज्ञानप्रद सोहळा ठरण्याची खात्री आहे.उपस्थित ज्योतिषप्रेमींसाठी विशेष लॉटरीचे आयोजन करण्यात आले असून, त्याद्वारे पाच भाग्यवान उपस्थितांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच प्रत्येक उपस्थितास ‘फलादेशाचे तंत्र’ हे पुस्तक भेट स्वरूपात दिले जाईल..