सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी वर्तनाचा संतापजनक प्रकार
  • मोठी बातमी: अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय
  • : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले,
  • पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले
  • वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या नवऱ्याकडून कौतुकाची उधळण
  • पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर
 जिल्हा

शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील खेळाडूंनी देशाचे नाव उंचवावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

डिजिटल पुणे    03-11-2025 17:39:33

सांगली : राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी राज्यभरातून विद्यार्थिनी खेळाडू, पंच आले आहेत. खेळाडूंनी संघभावना ठेवत जिद्दीने उत्कृष्ट कामगिरी करावी. महिला क्रिकेट विश्वचषकातील खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेऊन जगभरात देश व महाराष्ट्राचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छा उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी दूरदृश्यप्रणालीद्वारे ते बोलत होते.

श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, माजी तालुका क्रीडा अधिकारी उमेश बडवे, महाविद्यालयाचे रितेश शेठ, प्रकाश शाह आदि मान्यवर उपस्थित होते.क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 19 वर्षांआतील मुलींच्या वयोगटासाठी ही स्पर्धा होत असून ती 4 तारखेपर्यंत चालणार आहे.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघ व त्यात सहभागी असलेल्या सांगलीची क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे विशेष अभिनंदन केले. तसेच, राज्यभरातून आलेल्या खेळाडुंना महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा स्पर्धेच्या चांगल्या आयोजनासाठी त्यांनी संयोजकांचेही कौतुक केले.खासदार विशाल पाटील यांनी खेळाडूंनी संघभावनेने खेळून स्पर्धेचा आनंद लुटावा. यश अपयशाच्या पलिकडे जाऊन स्पर्धेत खिला़डू वृत्तीने सहभागी व्हावे व यशस्वी कामगिरी करावी, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्रिया घोटसकर (पुणे) व मनवा पाटील (इस्लामपूर) या भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. यावेळी एम. टी. देसाई, तालुका क्रीडा अधिकारी विकास माने, क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे, आरती हळिंगळी यांच्यासह राज्यभरातून आलेल्या खेळाडु उपस्थित होत्या. यावेळी खेळाडुंना शपथ देण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते मैदानपूजनाने स्पर्धेची सुरवात करण्यात आली.स्वागत व प्रास्ताविक उपसंचालक सुहास पाटील यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. सुहास व्हटकर यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती