सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • हरियाणात प्रत्येक 8 मतदारांमागे एक बोगस मतदार; काँग्रेसचा पराभव बनावट मतदानामुळे – राहुल गांधींचा आरोप
  • एमसीए निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात, तूर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे न्यायालयाकडून आदेश
  • राहत्या घरात दोष असल्याचे सांगितले, म्हणून तुमच्या मुली बऱ्या होत नाहीयेत, IT इंजिनिअर अन् शिक्षक पत्नीला भोंदूबाबनं कसं लुटलं, त्याच पैशांनी कोथरूडमध्ये विकत घेतला अलिशान बंगला
  • पुण्यातील पिंपरखेडमध्ये आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात सापडला, समोर माणसं दिसताच डरकाळी फोडली
  • आचारसंहितेपूर्वी काही तासांत 220 शासन निर्णय, राज्य सरकारकडून निधीचा पाऊस; बदल्या, नियुक्त्यांना धडाधड मान्यता!
 जिल्हा

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

डिजिटल पुणे    05-11-2025 10:41:29

मुंबई : केंद्रीय मार्ड ने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच सेन्ट्रल मार्डचे प्रतिनिधी डॉ. सचिन पाटील, डॉ. महेश तिडके, डॉ. कुणाल गोयल आणि डॉ. महेश गुरव उपस्थित होते.या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी रहिवासी डॉक्टरांचे विषय, मागण्या आणि मांडलेल्या मुद्द्यांकडे लक्षपूर्वक ऐकून घेतले. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, आंदोलनामुळे रुग्णसेवेत व्यत्यय येऊ नये यासाठी त्यांनी सध्या सुरू असलेला संप मागे घ्यावा. तसेच राज्य शासन या मागण्यांवर गांभीर्याने चर्चा करीत असून तातडीने पुढील पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत मुख्यमंत्री महोदयांसोबत ‘मार्ड’च्या मागण्यांवर लवकरच चर्चा होणार असल्याची माहिती दिली.दरम्यान, सेन्ट्रल मार्डचे च्या प्रतिनिधींनी शासनाकडून अधिकृत लिखित आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. रहिवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.राज्य शासन व मार्ड यांच्यातील पुढील चर्चेनंतर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती