उरण : राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसत आहे. संघटनेच्या माध्यमातून या वर्षातील हा ९ वा पगारवाढीचा करार १ नोव्हेंबर रोजी करण्यात झाला.आयओटीएल या केंद्र सरकारच्या उपक्रमातील मे. CIEL या कंत्राटाअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना केंद्र शासनाचा किमान वेतन मिळावा अशी मागणी कामगारांनी न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्विकारल्यामुळे लावून धरली होती त्या मागणीला यश येवून कामगारांना केंद्र शासनाचा किमान वेतन देण्याचा करार करण्यात आला. त्याचबरोबर ८.३३% बोनस, मेडिक्लेम पॉलिसी, भरपगारी रजा देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
या पगारवाढीमुळे कामगारांना किमान तीन ते सात हजार रुपयांची पगारवाढ होणार आहे. तसेच जून २०२४ पासून या पगारवाढीचा फरक मिळणार आहे त्यामुळे कामगारांची पुन्हा दिवाळी होणार आहे.या पगारवाढीच्या करारनाम्या प्रसंगी न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत, सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, विनोद म्हात्रे, सचिव लंकेश ठाकूर, अजित ठाकूर, तर व्यवस्थापनातर्फे संदीप काळे (सिनियर मॅनेजर HR & IR IOTL), आकाश तन्ना (रिजनल मॅनेजर CIEL), कामगार प्रतिनिधी राहुल ठाकूर, दिपक ठाकूर, शशिश कांबळे आदी उपस्थीत होते. या पगारवाढीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.