सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांच्या मुलावर जमीन घोटाळ्याचा आरोप, आता देवेंद्र फडणवीसांनी प्रकरणाची माहिती मागवली; पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार?
 जिल्हा

अनुवादकांनी अर्ज करण्याचे भाषा संचालनालयाचे आवाहन

डिजिटल पुणे    06-11-2025 11:34:43

मुंबई : भाषा संचालनालयामार्फत प्रशासकीय, कायदेविषयक, महसूल, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयांवरील अभिलेख व कागदपत्रातील मजकूर अनुवाद करण्यासाठी खासगी नामावली तयार करण्यात येत आहे. यासाठी तज्ज्ञ अनुवादकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अभिलेख व कागदपत्रांच्या फारसी व उर्दू मजकुरांचे इंग्रजी व मराठी भाषेत अनुवाद करणे तसेच मराठी व इंग्रजी भाषेतील मजकुराचे फारसी व उर्दू भाषेत अनुवाद करणे, तसेच मोडी मजकुराचे मराठीमध्ये लिप्यंतर व इंग्रजीमध्ये अनुवाद करणे, त्याचप्रमाणे इंग्रजी मजकुराचा मराठीत व मराठी मजकुराचा इंग्रजी अनुवाद करण्यासाठी अनुवादकांची खासगी यादी तयार करण्यात येत आहे. यासाठी तज्ज्ञ अनुवादकांनी मराठी भाषा विभागाच्या २२ मार्च २०२१ च्या शासन निर्णयान्वये १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करावेत.

याबाबतच्या अटी, शर्ती व इतर सविस्तर माहितीसाठी भाषा संचालनालयाचे https://directorate.marathi.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन संबंधितांनी आपले मूळ अर्ज प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रतीसह ‘भाषा संचालनालय, प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051’ या पत्त्यावर अर्ज पाठवावेत, असे भाषा संचालक अ. वा. गिते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


 Give Feedback



 जाहिराती