सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 DIGITAL PUNE NEWS

सुप्रसिद्ध अभिनेते श्री सयाजी शिंदे शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित.

डिजिटल पुणे    07-11-2025 13:13:58

पुणे : दिनांक 1 नोव्हेंबर रोजी  बाल गंधर्व रंग मंदिर पुणे येथे अभिनय सम्राट श्री सयाजी शिंदे यांचा त्यांच्या रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील प्रदीर्घ अभिनय सेवेबद्दल व सामाजिक सेवा कार्याबद्दल शांतीदूत परिवारातर्फे डॉ. विठ्ठल जाधव IPS, विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य ( से. नि) मार्गदर्शक शांतीदूत परिवार यांच्या हस्ते शांतीदूत सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शांतीदूत परिवार सेवा कार्याची माहिती देऊन सौ. विद्या ताई जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार यांचे हस्ते शांतीदूत परिवार स्मरणिका देण्यात आली व कला क्रीडा साहित्य शांतीदूत परिवारातर्फे योगेश जाधव व अनिता राठोड यांचे हस्ते भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

 

तसेच श्री सयाजी शिंदे यांचे स्वीय सहाय्यक श्री आदित्य गायकवाड यांचा सत्कार शेतकरी शांतीदूत परिवारातर्फे विजय ठुबे यांनी केला. तसेच शांतीदूत परिवारातर्फे पदाधिकारी श्री सुरेश सकपाळ, डॉ. प्रीती काळे, सौ. व श्री सदानंद बेलसरे पोलिस उपअधीक्षक से. नि., सौ. व श्री विजय वडदरे. न्यूज अन कट चे सौ.व श्री निखिल जाधव पोलिस मित्र शांतीदूत परिवार अध्यक्ष अकबर मेनन, मधू चौधरी, अध्यक्ष शांतीदूत परिवार शिवाजीनगर, नितीन दुधाटे आदी पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार  केला . पुनश्च एकदा शांतीदूत परिवारातर्फे श्री सयाजी शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन

 


 News Feedback

Digital Pune
रमेश तांभाळे
 07-11-2025 14:08:59

फार मस्त अभिनंदन 💐💐👍👍

 Give Feedback



 जाहिराती