सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
  • पार्थ पवारांनंतर अजितदादांचा दुसरा मुलगाही अडचणीत येणार? ‘टँगो’ दारू कंपनीवरून काँग्रेसचा सनसनाटी आरोप
  • मोठी बातमी: शिंदे अन् ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता; कोकणात गुप्त बैठक, राजकारणात एकच खळबळ
 जिल्हा

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

डिजिटल पुणे    07-11-2025 14:52:28

मुंबई  : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सुहास दिवसे यांच्यामार्फत सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक (मुख्यालय), पुणे राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), पुणे उदयराज चव्हाण, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, पुणे विभाग, धर्मदेव माईनकर, सह जिल्हा निबंधक वर्ग-1, पुणे शहर संतोष हिंगाणे, सहाय्यक्र नोंदणी महानिरीक्षक तथा कार्यासन अधिकारी क्र.4. नोंदणी महानिरीक्षक कार्यालय, पुणे अनुजा कुलकर्णी, अति. कार्य. सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक तथा कार्यासन अधिकारी क्र. 12, नोंदणी महानिरीक्षक कार्यालय, पुणे संजय पाटील हे या समितीचे सदस्य आहेत.या समितीने या प्रकरणी सखोल चौकशी करुन सविस्तर अभिप्रायासह आपला अहवाल 7 दिवसांत सादर करावयाचा आहे.


 Give Feedback



 जाहिराती