सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
  • पार्थ पवारांनंतर अजितदादांचा दुसरा मुलगाही अडचणीत येणार? ‘टँगो’ दारू कंपनीवरून काँग्रेसचा सनसनाटी आरोप
  • मोठी बातमी: शिंदे अन् ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता; कोकणात गुप्त बैठक, राजकारणात एकच खळबळ
 शहर

चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी घेतली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

डिजिटल पुणे    07-11-2025 17:32:01

पुणे : पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, या बैठकीतील एक किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.बैठकीच्या सुरुवातीला मोहोळ आणि पाटील यांच्यात खुर्चीवरून विनोदी शैलीत संवाद झाला. यावरुन राजकीय वर्तुळात उटल सुटल चर्चांना उधाण आले आहे.

पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. या भेटीनंतर मंत्री चंद्रकात पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत माझा आणि मुरलीधर मोहोळ यांचा कुठलाही गुन्हेगाराशी संबंध नाही आणि भारतीय जनता पक्ष कधीही कोणत्याही गुन्हेगाराला समर्थन करणार नाही असं म्हटले आहे. तसेच निलेश घायवळ आणि माझे संबंध आहेत याविषयी कोणाकडे पुरावे आहेत का की फक्त धंगेकरांकडे आहेत ? असं म्हणत त्यांनी माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांवर हल्लाबोल केला.

नेमकं काय घडलं?

सकाळी दहा वाजता हे दोन्ही नेते पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आणि या बैठकीला सुरुवात झाली. बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी दालनात बैठक व्यवस्थेसाठी मांडण्यात आलेल्या खुर्चीवरून एक मिश्किल प्रसंग घडला. दालनातील मुख्य आणि मधल्या खुर्चीवर कोण बसणार यावरून दोन्ही नेत्यांमध्ये मिश्किल प्रसंग झाला. यावेळी चंद्रकांत पाटील मुरलीधर मोहोळ यांना म्हणाले, “तुम्ही बसा प्रोटोकॉल आहे नाहीतर मला दिल्लीवरून नोटीस येईल बाकी काही नाही,” यावर खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले, “असं काही नाही, मी असं केलं तर माझी नोकरी जाईल.” बैठकीपूर्वी घडलेला हा मिश्किल प्रसंग कॅमेरा मध्ये कैद झाला.

माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्हा दोघांनाही पहिल्यांदा हे सांगायचंय की आमचा कुठलाही गुन्हेगाराशी संबंध नाही. अनेकदा मला दोन दोन तीन हजार लोकांना भेटावं लागतं त्यावेळी अनेकदा माहिती असून किंवा नसूनही फोटो काढले जातात. कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारी भाजप नाही. आम्ही पोलिसांना सांगितले कोण कशातून पैसा कमावतो याचा तपास करा त्यानंतर त्यांची वाढलेली संपत्ती याची ईडीकडे तक्रार करा. येता आठवडाभरात पोलीस गुन्हेगारांच्या नावासह ईडीकडे लेखी कंप्लेंट देणार आहेत असं माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले.तसेच रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलवा, नाटक करत असेल किंवा येत नसेल तर दिवसभर बसून ठेवा. मानसिकरित्या गुन्हेगारांवर तुमचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करा असं देखील पोलिसांना सांगितलं असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

तर माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, निलेश घायवळ आणि माझे संबंध आहेत याविषयी कोणाकडे पुरावे आहेत का की फक्त धंगेकरांकडे आहेत ? तर मी वरिष्ठ मंत्री असताना अशा पद्धतीचे आरोप केल्यामुळे आब्रू नुकसानी सजावट ठोकायला हवा. तुम्ही फक्त माझी इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न केला. आमच्याशी पंगा असेल तर आमच्याशी लढा, शहराची बदनामी का करता? मी गिरणी कामगाराचा मुलगा तर मग समीर पाटील माझ्याकडून नोकरीला कसा असेल ? निलेश घायवळला पासपोर्ट घेण्यास मदत कोणी केली याचं नाव का घेत नाहीत ? सचिन घायवळला शस्त्र परवाना कोणी दिला ते नाव समोर आलं मात्र मी त्यांची नाव घेणार नाही. केवळ धंगेकर आणि चंद्रकांत पाटील हे नाव घेतलं जातंय. असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

धंगेकरांच्या विरोधात गणेश बिडकरांनी एवढे पुरावे दिले पण त्या बातम्या तुम्ही चालवल्या नाहीत, माझ्या विरोधात एकही पुरावा नाही पण तुम्ही बातम्या चालवता. काही कारण नसताना मुरलीनंतर जैन समाजाच्या जागेच्या बाबतीत बदनाम केलं, पण त्यांना त्याने काही फरक पडणार नाही असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.


 Give Feedback



 जाहिराती