सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा
  • एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
  • दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
  • बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनींचा संताप; म्हणाल्या – “हे अत्यंत बेजबाबदार आहे!”
  • दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर पुण्यात हाय अलर्ट; रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात बंदोबस्तात वाढ
  • दिल्ली बॉम्बस्फोटानंतर राज्यभरात अलर्ट, मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
 व्यक्ती विशेष

वादग्रस्त वक्तव्यांमुळे रुपाली पाटील ठोंबरे अन् अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी; अजित पवारांचा मोठा निर्णय

डिजिटल पुणे    10-11-2025 15:03:57

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षाने आणखी एक धक्का दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीतून रुपाली ठोंबरे पाटील यांचे नाव वगळण्यात आले आहे. काही दिवासांपूर्वी त्यांना पक्षाने पक्षाकडून जगातील महिलांना न्याय देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी खुलासा मागण्यात आला होता. आता यादीतून थेट नाव वगळण्यात आल्याने ठोंबरे पाटील पक्षाला राम राम ठोकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने प्रवक्ते अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांना पदावरून काढले. रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर ही कारवाई झाली. दरम्यान, पक्षाने अनिल पाटील, रुपाली चाकणकर, ब्रिजमोहन श्रीवास्तव, चेतन तुपे, सुरज चव्हाण यांच्यासह नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली असून संघटनात मोठे बदल करण्यात आले आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांची पक्षातील पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात चाकणकरांनी पोलिसांची बाजू घेतल्याने त्यावर टीका झाली. ठोंबरेंनीही चाकणकरांवर टीका केली होती, ज्याची दखल घेत पक्षाने त्यांना नोटीस बजावली होती. खुलासा येण्यापूर्वीच त्यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली. पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीत ठोंबरेंचं नाव नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षातील काही नवीन चेहरे प्रवक्ते म्हणून समोर आले आहेत. मात्र, या नव्या यादीत रूपाली ठोंबरे यांचे नाव वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातून चेतन पाटील आणि विकास पासलकर यांची प्रवक्ते पदासाठी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या नव्या यादीत प्रदेश तसेच जिल्हास्तरावरील अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून, पक्षात नवे बदल घडवून आणण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आल्याचे दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नव्याने प्रवक्ते नियुक्त

अनिल पाटील

रुपाली चाकणकर

ब्रिजमोहन श्रीवास्तव

चेतन तुपे

आनंद परांजपे

अविनाश आदिक

सना मलिक

राजलक्ष्मी भोसले

सुरज चव्हाण

हेमलता पाटील

प्रतिभा शिंदे

विकास पासलकर

राजीव साबळे

प्रशांत पवार

श्याम सनेर

सायली दळवी

शशिकांत तरंगे


 Give Feedback



 जाहिराती