सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
  • ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
  • धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
  • बॉलिवूडचा 'ही-मॅन' काळाच्या पडद्याआड; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 DIGITAL PUNE NEWS

मोठी बातमी! बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक ; ब्रीच कँडी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू

डिजिटल पुणे    10-11-2025 17:27:06

मुंबई : बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सुरुवातीला त्यांना नियमित उपचारांसाठी ठेवण्यात आले होते; मात्र भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढू नये, यासाठी त्यांना मागील काही दिवसांपासून ICU मध्ये ठेवण्यात आल्याचं कळतंय.नुकताच त्यांच्या "२१" चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (वय ८९) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून, डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला धर्मेंद्र यांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते, मात्र आज सकाळी त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना ICU मधून व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत आणि उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत निवेदन अद्याप आलेले नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात हजेरी लावली असून, मुलींना अमेरिकेतून बोलावण्यात आले आहे.

अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेतसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी धर्मेंद्र यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला, त्यामुळे त्यांना ICU मधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून, सांगितले जाते की ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी अचूक तपशील मात्र अद्याप उपलब्ध नाही.

‘बॉलिवूडचे ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ यांसारख्या असंख्य गाजलेल्या चित्रपटांत काम केलं आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, करारी व्यक्तिमत्व आणि भावनिक अभिव्यक्ती यामुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती