मुंबई : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर थेट धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं. माध्यमांवर सातत्यानं धर्मेंद्र आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरत असल्यामुळे देओल कुटुंबीय सातत्यानं सोशल मीडियावर माहिती शेअर करतंय. तसेच, धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना अफवा आणि खोट्या बातम्या पसरवण्यापासून दूर राहण्याचं आवाहनंही केलंय.
बॉलिवूड अभिनेते ज्येष्ठ धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. काही माध्यमांनी तर त्यांच्या निधनाच्याही बातम्या दिल्या, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं.
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. अशातच त्यांच्या निधनाच्या अफवा सगळीकडे पसरल्या आहेत. अशातच सतत देओल कुटुंबीयांकडून त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स शेअर केले जात आहेत. अशातच आता पुन्हा एकदा धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन धर्मेंद्र यांचं निधन झालेलं नाही. त्यांच्या प्रकृतीती सुधारणा होतेय, अशी माहिती दिली आहे.
सनी देओलच्या टीमनं सर्वात आधी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट जारी केलं. त्यानंतर ईशा देओलनंही माध्यमांवर फिरत असलेल्या अफवा आहेत, तिचे वडील धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती दिली. तसेच, लोकांना खोट्या अफवा पसरवण्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. अशातच आता धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहेत आणि अफवा पसरवल्याबद्दल मीडियाला फटकारलं आहे.
या सर्व अफवांवर आता धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटर (X) वर लिहिलं आहे की “जे घडतंय ते अक्षम्य आहे! जबाबदार चॅनेल्स उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होणाऱ्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादर करणारं आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करा.”
दरम्यान, ईशा देओल आणि सनी देओलच्या टीमनेही धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिलं आहे. ईशा देओलनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं “माझे वडील स्थिर आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आम्ही सर्वांना आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो. माझ्या वडिलांसाठी केलेल्या प्रार्थनांबद्दल धन्यवाद.”
या पोस्टनंतर धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या धर्मेंद्र उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं देओल कुटुंबीयांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. देओल कुटुंबीयांनी सर्व चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती केली आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सत्यापित माहितीशिवाय कोणतीही बातमी शेअर करू नका.