सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा
  • एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
  • दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
  • बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनींचा संताप; म्हणाल्या – “हे अत्यंत बेजबाबदार आहे!”
  • दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर पुण्यात हाय अलर्ट; रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात बंदोबस्तात वाढ
  • दिल्ली बॉम्बस्फोटानंतर राज्यभरात अलर्ट, मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
 जिल्हा

उरण नगर परिषदेच्या निवडणुकीची भावी नगरसेवकांची जय्यत तयारी ;ऐन थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण तापले

डिजिटल पुणे    13-11-2025 09:35:15

उरण : उरण नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच व आचार संहिता लागू होताच ऐन थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण आता तापले आहे. प्रत्येक पक्ष आता पूर्ण ताकदीनीशी मैदानात दंड थोपटून उभे राहिले आहेत. उरण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.भावी नगरसेवकांनी गाठी भेटी घेण्यास सुरवात केली आहे. तर अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदारांना, ओळखीच्या मित्र परिवार, नातेवाईकांना फोन द्वारे संपर्क साधायला सुरवात केली आहे.यातच सर्व राजकारण ढवळून निघत आहे.उरण नगरपालिकेच्या सत्तेची रणधुमाळी सुरु झाली आहे. सोमवार दि. 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यानंतर उरणच्या गल्लीबोळात राजकीय तापमान चांगलेच चढले असून, कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


 उरण नगरपालिकेतील एकूण 10 प्रभागांतून 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षा असे 22 जनप्रतिनिधी निवडून देण्यात येणार आहेत.नगराध्यक्षा पद महिला राखीव असल्याने राजकीय पक्षांच्या गणितात उलथापालथ झाली असून, प्रत्येक पक्षाला योग्य महिला उमेदवार शोधण्यासाठी धडपड करावी लागत आहे. या निवडणुकीत एकूण 13,311 पुरुष आणि 12,903 महिला असे मिळून 26,214 मतदारांचे भवितव्य ठरणार आहे. हे मतदारच आता उरण नगरपालिकेच्या गादीवर कोण बसवायचे हे ठरवतील.या मतदारांच्या हातात नगराध्यक्ष व नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून आहे.प्रभागनिहाय मतदारसंख्या पाहिली असता प्रभाग क्रमांक 1 मध्ये पुरुष 1605, महिला 1706, प्रभाग 2 मध्ये पुरुष 1549, महिला 1613, प्रभाग 3 मध्ये पुरुष 1252, महिला 1168, प्रभाग 4 मध्ये पुरुष 1416, महिला 1321, प्रभाग 5 मध्ये पुरुष 1298, महिला 1268, प्रभाग 6 मध्ये पुरुष 1010, महिला 1049, प्रभाग 7 मध्ये पुरुष 1566, महिला 1388, प्रभाग 8 मध्ये पुरुष 955, महिला 893, प्रभाग 9 मध्ये पुरुष 1148, महिला 1145, आणि प्रभाग 10 मध्ये पुरुष 1512, महिला 1352 अशी मतदारांची आकडेवारी आहे. प्रभाग 1 ते 9 मधून प्रत्येकी 2 नगरसेवक, तर प्रभाग 10 मधून 3 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.


त्यासोबतच संपूर्ण उरण शहराच्या नेतृत्वासाठी एका नगराध्यक्षा पदासाठी निवडणूक होणार आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून, निकाल 3 डिसेंबर 2025  रोजी घोषित केला जाणार आहे. त्यामुळे केवळ काही आठवड्यांतच उरणच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.नगराध्यक्षा पद महिला राखीव असल्याने भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),शिवसेना (शिंदे गट ),राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट ),काँग्रेस, मनसे, शेकाप, वंचित बहुजन आघाडी, भारिप आणि स्थानिक गटांमध्ये नगराध्यक्ष उमेदवार निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.

 मागील निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणूक चूरशिची होण्याची दाट शक्यता आहे. भावी इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी निवडून येण्यासाठी कंबर कसली असून मतदार नेमकी कोणाला निवडून देतो. मतदार कोणाला कौल देतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.


 Give Feedback



 जाहिराती