उरण : उरण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता भाजपाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार शोभा कोळी - शाह यांच्या समावेत भाजपाचे सर्वच्या सर्व २१ नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा रायगड जिल्हा संपर्कमंत्री आशिष शेलार,पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी कोटनाका श्री राघोबा मंदिर येथून उरण नगरपरिषद कार्यालय निवडणूक कार्यालयापर्यंत संपूर्ण उरण शहरातून भाजपाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली.रॅलीतील रथामधून ना.आशिष शेलार,भाजपा नेते बाळासाहेब पाटील,आ.महेश बालदी,भाजपा उत्तर रायगडचे अध्यक्ष अविनाश कोळी आणि नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार शोभा कोळी - शाह शहरातील नागरिकांना संबोधित करीत होते.जोरदार घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन करीत निघालेल्या या साडेपाचशेहुन अधिक कार्यकर्ते सहभागी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व नगरसेवक पदाच्या निवडणूक अर्ज भरण्यासाठी निघालेल्या या रॅलीत भाजपचे विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उरण नगर परिषदेच्या थेट जनतेतून निवडलेल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उरण शहराध्यक्ष कौशिक शहा यांच्या पत्नी शोभा कोळी- शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला तसेच प्रभाग क्रमांक १ मधून रजनी सुनील कोळी(अ),जविंद्र लक्ष्मण कोळी (ब ), प्रभाग क्रमांक २मधून रिबेका रविंद्र मढवी (अ ), नंदकुमार बाबाजी लांबे (ब),प्रभाग क्रमांक ३ मधून नम्रता प्रवीण ठाकूर ( अ),सुरेश वामन शेलार (ब), प्रभाग क्रमांक ४ मधून संदिप शशिकांत पानसरे (अ),रोशनी सचिन थळी( ब),प्रभाग क्रमांक ५ मधून हिदा हमीद सरदार (अ),जसीम इस्माईल गँस (ब), प्रभाग क्रमांक ६ मधून स्नेहल भिमदास कासारे (अ),रिना निलेश पाटील (ब), प्रभाग क्रमांक ७ मधून शाहिस्ता इब्राहिम कादरी (अ),रवी यशवंत भोईर (ब),प्रभाग क्रमांक ८ मधून पूर्वा योगेश वैवडे (अ), रोहित नितीन पाटील (ब), प्रभाग क्रमांक ९ मधून गणेश सदाशिव पाटील ( अ ),सायली विशाल पाटेकर ( ब ),आणि प्रभाग क्रमांक १० मधून राजेश मधुकर ठाकूर (अ), सायली सविन म्हात्रे ( ब ), दमयंती वैभव म्हात्रे ( क)अशा २१ उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार डॉ उध्दव कदम यांच्या कडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी राज्याचे केबिनेट मंत्री नामदार आशिष शेलार, पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील,माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे,प्रितम म्हात्रे, भाजपचे उपाध्यक्ष चंद्रकांत घरत, कामगार नेते सुधीर घरत, शहराध्यक्ष कौशिक शहा, भाजपचे तालुका उपाध्यक्ष पंडित घरत,माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,माजी सरपंच जितेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष नितीन पाटील,भाजपचे तालुका सरचिटणीस समीर मढवी,नवीन शेठ राजपाल महिला नेत्या सीमाताई घरत,राणी म्हात्रे सह भाजपचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरसेवक पदाच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.उरणचा सर्वांगीण विकास करण्याचे काम उरणचे आमदार महेश बालदी यांनी केले आहे.त्याच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेल्या उरण नगर परिषदेच्या निवडणुकीला भाजपा महायुती सामोरे जात असून उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपा महायुती विजयाची पताका पुन्हा एकदा फडकणार आहे.असा विश्वास नामदार आशिष शेलार यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला आहे.