सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लिम नगरसेवक विजयी, नाशिक जिल्ह्यात खातं उघडलं
 विश्लेषण

थंडीचा कडाका! पुण्यात विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद; कोकणातील ‘महाबळेश्वर’ दापोलीत हाडं गोठवणारी थंडी; परभणी ७ अंशांवर

डिजिटल पुणे    19-11-2025 10:07:51

 पुणे :  राज्यातील बहुतांश शहरांमध्ये थंडीची लाट पसरली असून पारा एक एक अंकी आकड्यावर येऊन पोहचला आहे. अशातच आता पुण्यात तीन वर्षांनी विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठला असून पुणे शहराचं तापमान सरासरी 9.4 अंशावर येऊन पोहचलंय. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल (18 नोव्हेंबर) पुण्यात 9.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान आगामी काळात तापमानाचा पारा आणखी घटण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर लोणी काळभोर येथे 6.9 इतक्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

पुण्यात गेल्या तीन वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुणे शहरात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. मंगळवारी शिवाजीनगर येथे ९. ४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. लोणी काळभोर (हवेली) येथे तर ६. ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने आणि निरभ्र आकाशामुळे थंडीचा प्रभाव वाढला आहे.

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात कमी-जास्त होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठला आहे. पुणे शहराचं तापमान सरासरी 9.8 अंशावर आलं आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल पुण्यात 9.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

दुसरीकडे कोकणातही थंडीचा जोर वाढल्याचे चित्र आहे. रत्नागिरीच्या दापोली गारठली असून तापमानाचा पारा 8 अंशावर पोहचला आहे. सध्या कोकणात कडाक्याची थंडी जाणवायला लागली असून दापोली गारठली आहे. दापोलीत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी 8°C तापमानाची नोंद झाली. किमान–कमाल तापमानात तब्बल 22 अंशांची तफावत नोंदवली आहे. कोकणातील ‘महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत तीव्र गारठा जाणवत असून परिसर अक्षरशः गारठला आहे. तर सिंधुदुर्गात 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यातील बहुतांश शहरांमध्ये थंडीची लाट जोर धरत असून पारा तब्बल एक अंकी आकड्यावर येऊन पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत तापमानात मोठी घसरण नोंदवत पुण्यात तीन वर्षांतील सर्वात नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे.

पुणे 9.4°C वर, लोणी काळभोर सर्वात थंड

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुण्यात गारठा वाढला आहे. मंगळवारी (18 नोव्हेंबर) शिवाजीनगर येथे 9.4°C इतके किमान तापमान नोंदवण्यात आले, जे गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे.तर लोणी काळभोर येथे तब्बल 6.9°C इतक्या विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद झाली.निरभ्र आकाश, कमी आर्द्रता यामुळे थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. हवामान खात्यानुसार पुढील दोन–तीन दिवसांत तापमानात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

कोकणातही गारठ्याचा जोर, दापोलीत 8°C

कोकणातही थंडीने चांगलाच कहर केला आहे. रत्नागिरीच्या दापोलीत तापमान 8°C पर्यंत घसरले असून यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद इथे झाली आहे.दापोलीतील किमान आणि कमाल तापमानात तब्बल 22 अंशांची तफावत नोंदली गेली आहे.‘कोकणातील महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत परिसर अक्षरशः गारठला आहे. सिंधुदुर्गातही तापमान 14°C वर पोहोचले आहे.

परभणी 7°C वर; जिल्ह्यात शेकोट्यांचा आधार

मराठवाड्यातील परभणीतही थंडीची लाट कायम आहे. आज परभणी शहराचे तापमान 7°C इतके नोंदले गेले आहे, जे यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी आहे.मागील आठवडाभर जिल्ह्यात तापमान सतत 10 अंशाखालीच असून नागरिकांना दिवसभर गारवा जाणवत आहे. ग्रामीण भागासह शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत लोक थंडीपासून दिलासा मिळवताना दिसतात.

गोंदियात दाट धुक्याची चादर

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. देवरी शहरात आज सकाळच्या सुमारास दाट धुक्याची चादर पसरली होती. रस्त्यावर काही मीटर अंतरावरही वाहन दिसत नसल्याने वाहतूक मंदावली.नगरपंचायत मैदानावर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी ‘गुलाबी थंडी’ आणि दात धुके असे अप्रतिम दृश्य अनुभवले.

 


 Give Feedback



 जाहिराती