सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
  • अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; अनगरमध्ये बाळराजेंकडून चॅलेंज, आता राजन पाटील यांनी माफी मागितली!
  • थंडीचा कडाका! पुण्यात विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, कोकणातील ‘महाबळेश्वर’ असणाऱ्या दापोलीत हाडं गोठवणारी थंडी, परभणीचे तापमान 7 अंशावर
  • ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला
 जिल्हा

महाराष्ट्र शासन व जीएएमई करारामुळे सूक्ष्म उद्योगांना मोठा दिलासा; रोजगारनिर्मितीला वेग मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    19-11-2025 16:37:16

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र शासन आणि ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रुनरशिप (जीएएमई) यांच्यात  वर्षा निवासस्थानी सहकार्य करार झाला, यामुळे राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) क्षमता वाढवण्याला मोठा वेग मिळणार आहे. या करारामुळे विशेषत: सूक्ष्म उद्योगांचे सबलीकरण, रोजगारनिर्मिती आणि जिल्हास्तरीय उद्यमशीलता इकोसिस्टम सक्षम होणार आहे.जीएएमई ही ज्युनिअर अर्चिव्हमेंट इंडिया सर्व्हिसेस (जेएआयएस) अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय पातळीवरील उद्यमशीलता बळकटीकरण संस्था असून भारताला नोकरी शोधणाऱ्यांपासून नोकरी निर्माण करणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याचे तिचे ध्येय आहे. महाराष्ट्रात सुमारे 50 लाख एसएसएमई उद्योग असून त्यापैकी 99% सूक्ष्म उद्योग आहेत. बहुतांश उद्योग पाचपेक्षा कमी कामगारांवर चालतात. यामुळे आर्थिक गती आणि रोजगारनिर्मिती मर्यादित राहते.

या कराराद्वारे उद्योग विभाग आणि जीएएमई मिळून कोहोर्ट-आधारित बिझनेस ॲक्सेलरेटर कार्यक्रम राबवणार आहेत. यामुळे उद्योजकांची व्यवसाय क्षमता, बाजारपेठ समज, व्यवस्थापन आणि स्पर्धात्मकता वाढेल. सूक्ष्म उद्योगांना लघु व मध्यम पातळीवर नेण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाल्याने प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात वाढेल. जिल्हा उद्योग केंद्रे आधुनिक पद्धतींनी सक्षम केली जातील. प्रत्येक जिल्ह्याचा स्थानिक उद्योग नकाशा तयार करून त्या त्या भागातील संधी ओळखल्या जातील. युवांसाठी कौशल्य-विकास, तर महिलांसाठी उद्योजकतेतील सहभाग वाढवण्याचे कार्यक्रम राबवले जातील. विविध जिल्ह्यांतील यशस्वी उद्योजकांना समोर आणून अधिकाधिक नागरिकांना उद्योजकतेकडे प्रेरित करण्यात येईल. त्याचबरोबर महाविद्यालये, बँका, उद्योगसंस्था, कॉर्पोरेट्स आणि माध्यमांच्या सहभागातून उद्योजकांना मार्गदर्शन, कर्जसहाय्य आणि बाजारपेठेतील संधी उपलब्ध होतील.

या करारामुळे महाराष्ट्र स्टेट इंटरप्रेनुअरशीप मिशनला (एमएसईएम) या करारामुळे अधिक बळ मिळणार आहे. स्थानिक इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी जीएएमई कडे देशातील विविध मॉडेल्सचा अनुभव असल्याने महाराष्ट्रात त्याचा फायदा थेट उद्योगांना मिळणार आहे.या कराराच्या वेळी उद्योग सचिव डॉ.पी.अन्बळगन,  जीएएमई संस्थेचे संस्थापक रवी वेंकटेशन, अध्यक्ष केतुल आचार्य, माजी प्रधान सचिव (उद्योग) विनेश जैरथ, मिशन डायरेक्टर लेफ्टनंट कमांडर योगेश भावसार (निवृत्त) तसेच नागपूर उद्यमशीलता मिशन कोर ग्रुपचे शशिकांत चौधरी, दुष्यंत देशपांडे आदि उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती