पुणे : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी जयंती निमित्त कोंढवा येथे काँग्रेस कार्यकर्त्या सौ.मुबीन अहमद खान तसेच संयोजक अहमद समद खान यांच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.आरोग्य शिबिर, विविध शासकीय योजना माहिती अभियान,पशू चिकित्सा आदी उपक्रम दिवसभर आयोजित करण्यात आले.
माजी नगरसेवक अविनाश बागवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.काँग्रेस अल्पसंख्य विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष यासिन शेख,पुणे शहर अल्पसंख्य विभाग अध्यक्ष जान मोहम्मद ,वरिष्ठ उपाध्यक्ष असलम मिरजकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.आभार प्रदर्शन अहमद खान यांनी केले.या कार्यक्रमात उस्मान तांबोळी, जाहिद शेख,नूर शेख,देविदास लोणकर, संदेश दिवेकर,सचिन अल्हाट,राजू सय्यद उपस्थित होते.सत्यानंद हॉस्पिटल जवळ मुख्य कोंढवा रस्त्यावर झालेल्या या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.