सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी, रचला नवा विक्रम; मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन
  • गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
  • अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; अनगरमध्ये बाळराजेंकडून चॅलेंज, आता राजन पाटील यांनी माफी मागितली!
  • थंडीचा कडाका! पुण्यात विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, कोकणातील ‘महाबळेश्वर’ असणाऱ्या दापोलीत हाडं गोठवणारी थंडी, परभणीचे तापमान 7 अंशावर
 जिल्हा

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण

डिजिटल पुणे    20-11-2025 15:52:19

मुंबई :  भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड  (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात एसएसबी कोर्स क्रमांक ६४ आयोजित करण्यात आला आहे. हा कोर्स १५  ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत होणार असून प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास व भोजनाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी १० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी सैनिक वेलफेअर विभाग, पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावरून एसएसबी-६४ कोर्सचे प्रवेशपत्र व परिशिष्टे डाउनलोड करून पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे.

एस.एस.बी. प्रशिक्षण कोर्ससाठी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे.

कम्बाईड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-यूपीएससी) किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (एनडीए-यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण असणे व एसएसबी मुलाखतीसाठी पात्रता मिळालेली असणे आवश्यक आहे.

एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडसह उत्तीर्ण असणे तसेच एसएसबी या पदासाठी एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरकडून शिफारस असणे आवश्यक. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबीसाठी  मुलाखतीचे कॉल लेटर असणे आवश्यक.

विद्यापीठ प्रवेश प्रणाली (यूईएस) साठी एसएसबी कॉल लेटर असणे किंवा शिफारस यादीत नाव असणे आवश्यक.

प्रशिक्षण केंद्राबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी खालील माध्यमांतून कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल

ईमेल : [email protected] दूरध्वनी : 0253-2451032, व्हॉट्सअ‍ॅप: 9156073306

अधिकाऱ्यांनी इच्छुक युवक–युवतींनी या मोफत  प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती