सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरेंशी फारकत घेणाऱ्या काँग्रेससोबत जाण्यास शरद पवारांचा नकार, राज-उद्धवशी युती करण्याचे संकेत
  • काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा टोला
  • मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई; घेतलेले पैसे वसूल होणार!
 जिल्हा

अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात; ड्रायव्हरला हार्ट अटॅक….निवडणूक लढणाऱ्या महिलेचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

डिजिटल पुणे    22-11-2025 13:29:32

अंबरनाथ : अंबरनाथ उड्डापूलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून एकनाथ शिंदे गटाच्या महिला उमेदवार किरण चौबे गंभीर जखमी झाल्या आहेत.अंबरनाथ उड्डापूलावर घडलेल्या हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरला हार्टअटॅक आल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या अनेक दुचाकींना जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, किरण चौबे यांचा ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे याला अचानक हार्टअटॅक आला. त्यामुळे त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं अशी माहिती चौबे यांच्या नातेवाईकांनी दिली.

अपघातात ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे, अंबरनाथ महानगरपालिकेचे दोन कर्मचारी आणि एका पादचारी नागरिकाचा मृत्यू झाला. किरण चौबे यांना सुद्धा या अपघातात मार लागला आहे. त्यांना तातडीने कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही  फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटनेचा थरार कैद झाला आहे.

उड्डापूलावरून एक जण खाली पडला

अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की वेगाने येणाऱ्या कारने समोरच्या तीन ते चार दुचाकांनी जोरदात धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की कार जाग्यावर पलटी झाली तर एक जण उड्डानपूलावरून खाली पडताना दिसत आहे.

अंबरनाथ शहरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना शुक्रवारी संध्याकाळी उड्डाणपूलावरून पूर्व भागातून पश्चिमेकडे एक महिला उमेदवार आपल्या चालकासह पश्चिमेत सभेसाठी चालल्या होत्या. यावेळी त्याच्या वाहन चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने त्याने समोरून येणाऱ्या पाच ते सहा दुचाकींना जोरदार धडक देत कार पलटी झाली. या भीषण अपघात दुचाकीवरील एक चालक कारच्या धडकेत थेट उड्डाणपुलाच्या खाली फेकला गेला. त्यामुळे उड्डाणपूलावर एकच खळबळ उडाली. त्यानंतर इतर वाहन चालक आणि उड्डाणपुलाखालील लोकवस्तीतील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. या अपघातात कार चालक लक्ष्मण शिंदे यांच्यासह दुचाकीवरील दोघे पालिका कर्मचारी असलेले शैलेश जाधव उल्हासनगरचा सुमित आणि दुचाकीस्वार इतर अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात सहा जखमी झाले आहेत. त्यात बुवपडा येथे राहणारा अमित चव्हाण हा जखमी झाला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपला निवडणूक प्रचार मध्येच थांबवून थेट घटनास्थळी, रुग्णालयाकडे धाव घेतली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केल्याने रुग्णालय प्रशासनाला स्थिती संभाळताना तारेवरची कसरत करावी लागली. या अपघातामुळे उड्डाणपूल आणि कल्याण, बदलापूर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिक तपास करत होते.


 Give Feedback



 जाहिराती