उरण: दिनांक १५ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान थिम्पू, भूतान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत जसखार, ता. उरण, जि. रायगड येथील मैत्रेय राजश्री गणेश मोकल यांनी ९३ किलो वजनी गटामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक (GOLD MEDAL) पटकावले आहे.पूर्वी, दिनांक १८ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान टाटानगर, झारखंड येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक जिंकले होते. त्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारावर त्यांची आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली होती.
मैत्रेय यांना शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले.त्यांची जिद्द, चिकाटी आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.या स्पर्धेसाठी अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण यांनी आर्थिक निधी उपलब्ध करून मैत्रेयला मोलाचे सहकार्य केले व आशीर्वाद दिले.या स्पर्धेत जगभरातून १५० स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातून एकूण ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.मैत्रेय यांच्या या सुवर्णमयी कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र मनःपूर्वक कौतुक होत आहे. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.