पुणे : यशवंत साखर कारखाना जमीन विक्रीला संचालक मंडळासह अजित दादा पवार हे ही जबाबदार असून दोनशे कोटी च्या भ्रष्टाचार विरुद्ध कायदेशीर लढा आणी आंदोलनात्मक लढाई लढली जाणार आहे. यशवंत बचाव सभासद कृती समिती चे अध्यक्ष विकास लवांडे आणी सहकाऱ्यांनी 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघात ही पत्रकार परिषद झाली.
यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर येथील शंभर एकर जमीन संचालक मंडळाने बनावट कागदपत्रे तयार करून, मृत सभासदांच्या सह्या करून,खोटे प्रोसिडिंग तयार करून,शासनाची दिशाभूल करत जमीन विक्री करण्याचा घाट घातला आहे.
याच्यामध्ये प्रचंड मोठा गैरव्यवहार झालेला आहे बाजारमूल्य 512 कोटी असताना 299 कोटीला ही जमीन देण्याचा ठराव केला आहे. बाजार समितीने बेकायदा छत्तीस कोटी रुपये कारखान्याला ट्रान्सफर केले.नोटरी करून पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा व्यवहार केला. मुद्रांक शुल्क बुडविले. सभासदांची दिशाभूल केली.दोन्ही संस्थांचे प्रमुख हे सखे भाऊ आहेत. या सर्वांनी संगणमताने व अजित दादा पवार यांच्या सहकार्याने हा व्यवहार केलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयात 5270/2025 ही आमची रिट पिटीशन दाखल असून सुनावणी चालू आहे. तरीसुद्धा दोन्ही संस्थांच्या प्रमुखांनी कोर्टाला न जमता इकडे मनमानी कारभार सुरू ठेवला आहे त्याला राज्य शासन पाठबळ देत आहे याचे नवल वाटते
200 कोटी रुपयांचा साखर कारखान्याचा तोटा झालेला आहे.याबाबत 21 नोव्हेंबर रोजी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात व लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे आम्ही सभासदांनी सर्व पुराव्यासह रीतसर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा अर्ज दिलेला आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली झालेली आहे. यावेळी शेतकरी सभासद कृती समितीचे सदस्य राजेंद्र चौधरी, सागर गोते, अलंकार कांचन, आबा गायकवाड, लोकेश कानकाटे,बाळकृष्ण कामठे,सूर्यकांत काळभोर इत्यादी उपस्थित होते.लोणी काळभोर पोलीस कडून तपास EOW मार्फत सुरू आहे.पोलिस आयुक्त पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास व चौकशी सुरू आहे.
बाजार समितीला शासनाकडून कुठलाही स्वतंत्र आदेश अथवा सूचना नसताना देखील बाजार समितीने मनमानी पद्धतीने जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी पाचशे रुपये स्टॅम्प पेपरवर नोटरी मार्फत व्यवहार करार केला आहे शासनाचा मुद्रांक शुल्क बुडवला आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर या दोन्ही संस्थांचे प्रमुख व संचालक मंडळ या प्रकरणात कायदेशीर दृष्टीने पूर्ण अडकलेले आहेत त्यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तांनी तात्काळ गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे.अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले