उरण: उरण नगर परिषदेच्या निवडणुक संदर्भात दिनांक २१ रोजी अनेक उमेदवारांनी अर्ज पाठीमागे घेतल्यानंतर उरण नगर परिषद निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी ४ तर २१ पदासाठी ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून यात शिवसेना महायुतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवार ही निवडणूक रिंगणात उभे आहेत. शिवसेना महायुतीचे नागराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या उरण शहरातील कामठा रोड येथील जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आला. उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते व भावी उमेदवारांच्या हस्ते श्री गणेश पूजन करून व वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
त्यानंतर श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.या वेळी प्रभाग क्रमांक १ ब चे नगरसेवक पदाचे उमेदवार अनंत मधुकर कोळी, प्रभाग क्रमांक ३ ब चे नगरसेवक पदाचे उमेदवार तुषार शंकर ठाकूर, प्रभाग क्रमांक ४ अ चे नगरसेवक पदाचे उमेदवार हंसराज महादेव चव्हाण, प्रभाग क्रमांक ४ ब चे नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपाली तुषार ठाकूर, प्रभाग क्रमांक ७ ब चे नगरसेवक पदाचे उमेदवार आशमील महमद अली मुकरी या उमेदवारांनी मोठया प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत प्रचाराला सुरवात केली.या वेळी रिचर्ड सेबेस्टीन पीटर, इकबाल कुट्टी, तफजुल फसाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश केला.या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल भगत, तालुका प्रमुख दिपक ठाकूर, शहर प्रमुख सुलेमान शेख, माजी नगरसेवक तुषार ठाकूर, निवडणूक प्रभारी सुनिल भोईर, विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे, उरण तालुका प्रमुख दशरथ चव्हाण आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.