सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरेंशी फारकत घेणाऱ्या काँग्रेससोबत जाण्यास शरद पवारांचा नकार, राज-उद्धवशी युती करण्याचे संकेत
  • काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा टोला
  • मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई; घेतलेले पैसे वसूल होणार!
 जिल्हा

भागवत संप्रदायाने माणुसकीचा संदेश जगभर पोहोचवला — विश्वनाथ (अण्णा) तोडकर

डिजिटल पुणे    24-11-2025 12:58:07

अचलबेट तुरोरी–कराळी (ता. उमरगा) : भागवत सांप्रदायानी जात,पात, धर्माच्या पलीकडे जाऊन माणूसपण जपण्याचा विचार महाराष्ट्रालाच नाहीतर पूर्ण जगाला दिला.असे गौरव उद्गार काव्यप्रेमी महाराष्ट्र आयोजित अभंगवाणी राज्यव्यापी साहित्य संमेलनात उद्घाटन प्रसंगी मांडले. याप्रसंगी प्राचार्य वेंकट अणिगुंटे यांनी संप्रदाय हा माणसाला मुक्ती देण्याचा,शांततेचा आणि सौंदर्याचा विचार देतो.असेही या प्रसंगी त्यांनी विचार मांडले.अभंगवाणी राज्यव्यापी साहित्य संमेलनाचे आयोजन श्री क्षेत्र अचलबेट तुरोरी - कराळी तालुका उमरगा या ठिकाणी संपन्न झाले.

 या प्रसंगी विचारपीठावरती ह.भ.पं श्री हरी महाराज लवटे गुरुजी,ह.भ पं.भीम महाराज,अनाथ गरिबांची माय विद्याताई वाघ,प्राचार्य वेंकट अणिगुंठे,या महान विभूती उद्घाटक म्हणून विशेष उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला.आलेल्या पाहुण्यांच्या वरती पुष्पवृष्टी करून हरीणमाच्या गजरामध्ये अचलबेट देवस्थानच्या पवित्र ठिकाणी दिंडी काढून सुरुवात करण्यात आली. परमपूज्य काशिनाथ महाराज परमपूज्य उज्वलानंद महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून पुष्पवृष्टी करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

मान्यवरांच्या स्वागतानंतर अभंगांनी कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून आलेले साहित्यिक, प्रवचनकार अभंगकार, प्राध्यापक, शिक्षक,वारकरी यांच्या अभंग वाणीतून जणू विठ्ठल अचलबेटी अवतरल्याचा भास झाला. हरिनामाच्या गजरामध्ये प्रत्येक अभंग नवा संप्रदायाचा सुगंधीत रंग तरंग निर्माण करत होता.एकूण महाराष्ट्रातल्या 66 कवींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सांगता आलेल्या प्रत्येक साहित्यिकांना ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून उमरगा येथील मॉर्निंग वॉकचे सदस्य, काव्यप्रेमी महाराष्ट्राचे सदस्य, अभंगवाणी साहित्य संमेलनाचे पदाधिकारी संयोजक,विकास राठोड,लक्ष्मण पवार,सुनंदा भगत सुधाकर झिंगाडे,कमलाकर भोसले,विकास गायकवाड,राज जाधव के पी पवार, महाजन सर, दळगडे सर यांनी परिश्रम घेतले.माजी आयपीएस कमिशनर विठ्ठलराव जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला शितल गहेवार,अस्मिता सुरवसे, स्वाती माने,अक्षय कामले,विजय टाकळे,आणि समाज विकास संस्थेमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी यांनी खूप परिश्रम घेतले.

 सोबत अचलबेट देवस्थानचे सर्व पदाधिकारी बाळ गोपाळ वारकरी या सर्वांच्या परिश्रमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होते.अभंगवाणी सोबत महाप्रसादाने सर्वजण तृप्त झाले.या कार्यक्रमाचे आयोजन समाज विकास संस्थेचे सेक्रेटरी,महाराष्ट्र लोकविकास मंचचे सचिव,उत्तर एनजीओ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री भूमिपुत्र वाघ यांनी केले होते.. तर सूत्रसंचालन सन्माननीय भैरवनाथ कानड यांनी केले....


 Give Feedback



 जाहिराती