सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राने कारमध्येच गर्भलिंग निदान केलं, नाशिकमध्ये बड्या डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
  • धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
 क्राईम

धक्कादायक! सासऱ्याला लढायची होती निवडणूक, १० लाख रुपयांसाठी सुनेकडे तगादा; छळाला कंटाळून आयुष्य संपवलं

डिजिटल पुणे    25-11-2025 11:01:20

कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कानाकोपऱ्यात रणधुमाळी सुरु आहे. अनेक ठिकाणी गुपचुप पैशाचे वाटप सुरु आहे. अनेक नेतेमंडळींना प्रचाराचा नारळ फोडला आहे. दरम्यान, कोल्हापूरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याच्या प्रचारासाठी माहेरुन पैसे आण, यासाठी सुरू असलेल्या छळामुळे एका सुनेने टोकाचे पाऊल उचलत मृत्यूला कवटाळले.

कौसर गरगरे असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुरुंदवाड येथे घडली आहे. पतीच्या व्यवसायासाठी आणि सासऱ्याच्या निवडणुकीच्या खर्चासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये, असा तगादा सातत्याने सासरचे मंडळी लावत असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी नातेवाइकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, कौसरचा सासरा राजमहंमद गरगरे, सासू मुमताज गरगरे, पती इंजमाम राजमहंमद गरगरे (वय 31) आणि जाऊ समिना इलहान गरगरे (वय 28 ) यांनी वारंवार आर्थिक मागणीचा दबाव टाकला. पतीच्या व्यवसायासाठी आणि सासऱ्याच्या निवडणुकीच्या खर्चासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावून तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कौसरचा भाऊ अलताफ आवटी (रा. जयसिंगपूर) यांनी कुरुंदवाड पोलिसात तक्रार दाखल केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील विवाहित महिलेनं सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासातून टोकाचं पाऊल उचललं. कौसर गरगरे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी कौसर यांचा भाऊ अल्ताफ आवटी यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कौसर यांचा पती, सासू-सासऱ्यासह जावेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कौसर यांचा सासरा राजमहंदर गरगरे कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आहे. त्यामुळे निवडणुकीत खर्च करण्यासाठी माहेराहून 10 लाख घेऊन येण्याची मागणी विवाहितेकडे केली जात होती. त्यासाठी, सासरच्या मंडळींकडून कौसर यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यामुळे, गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कौसर यांनी घराच्या छताला गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने विवाहित महिलेला देण्यात आलेल्या त्रासामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणातील दोन आरोपी कौसरचा पती इंजमाम गरगरे आणि जाऊ समिना गरगरे यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सासू आणि सासऱ्याची अद्याप अटक झालेली नाही. पोलीस त्यांची भूमिका आणि सहभाग तपासत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती